व्हीजन डॉक्युमेंट शंभर टक्के यशस्वी – कानिटकर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवाचे आयोजन
नाशिक ःप्रतिनिधी
व्हिजन डॉक्यूमेंट योग्य पद्धतीने राबविण्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परिवाराच्या सहकार्याने यशस्वी झालो आहोत.वातावरण,कोर्सेस,नवीन विभाग असो,ऑटोमेशन ,परीक्षा विभाग प्रत्येक गोष्टीत नवीन स्फूर्ती आणण्याचा प्रयत्न केला आहे.
रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत असतांना एक प्रकृती आणि दृष्टी इंटिग्रेटेड रिसर्च यासाठी सुविधा तयार केली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विद्यापिठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी व्हीजन डॉक्युमेंट शंभर टक्के यशस्वी झाल्याचे सांगितले. भविष्यात आणखी वैद्यकीय महाविद्यालये नवीन अभ्यासक्रम,नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल करण्यात येत असून डिजिटायझेशन,नॅक ऍक्रेडेशन या बाबतीत माहिती दिली.
यावेळी प्रतिकुलगुरू मिलिंद निकुंभ,कुलसचिव राजेंद्र बंगाळ,एमपीजीआय चे अघिष्टाता डॉ.झा,जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील तोरणे आदींसह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रतिकुलगुरू मिलिंद निकुंभ यांनी नॅक ऍक्रेडेशन बाबतीत मार्गदर्शन,माहिती दिली.महाविद्यालयांसाठी क्वालीटी अशुरंस सेल उपलब्ध करण्यात आला असल्याचे यावेळी सांगितले.
सर्वसमावेशक प्रणाली सी डॅक मार्फत धोरण तयार करण्यात येणार आहे. नियामक तयार करण्यात आले आहे.मानसिक आरोग्य ऍप तयार करण्यात आले आहे.आयुष रिसर्च डिपार्टमेंट असे अनेक विभाग कार्यान्वित केले आहे.यासाठी शैक्षणिक डीनचे एक नवीन पद निर्माण केले आहे. तसेच पंचकर्म सेंटर सुरू झाले आहे. ते सर्वासाठी खुले असणार असून त्याचे दर शासकिय असणार आहे.संवेदना गार्डन,गेस्टहाऊस कॅन्टीन यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
परीक्षा विभागाचे प्रमोद पाटील यांनी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग भारत सरकार यांच्या नवीन शैक्षणीक धोरणास अनुसरून सुधारीत अभ्यासक्रमाच्या सर्वागिण गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक ब्लूप्रिंटस् विद्यापीठाने तयार केला आहे.अशी ब्लूप्रिट तयार करणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे.तसेच परीक्षांदरम्याने होणार्‍या गैरप्रकार टाळण्यासाठी प्रयत्नीशील राहीले आहे. परीक्षांचे निकाल मुदतीत जाहीर करण्यात आले आहे.परीक्षांचे ऑनलाईन ऑनस्क्रिन डिजिटल इव्हॉल्युएशन यशस्वी पार पडले आहे.यापुढे सर्व परीक्षांसाठी ऑनलाईन ऑनस्क्रिन डिजिटल इव्हॉल्युएशन वापर करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे सांगितले.
यावेळी विविध विभागातील तज्ज्ञांनी व्हिजन डॉक्युमेंटच्या यशस्वीतेसाठी केलेली वाटचाल मंजूर निधी याबाबत उहापोह करण्यात  आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *