नार्वेजेनियन कॉन्सुलेट जनरल शिष्टमंडळाची पालिकेला भेट



प्लास्टिकचा पुर्नवापर, ई-कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया मुद्यांवर बैठकीत चर्चा, तंत्रज्ञानाबाबत सहकार्य करणार

नाशिक : प्रतिनिधी

नॉर्वे देशाच्या मुंबई येथील नार्वेजेनियन कॉन्सल जनरल अर्नेजन फ्लोलो आणि त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी ( दि. ३१ ) महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी मनपातर्फे राबवण्यात येणा-या विविध प्रकल्पांची माहिती शिष्टमंडळास देण्यात आली. कॉन्सुलेट जनरल अर्नेजन फ्लोलो यांनी मनपाला भेट देण्याचा उद्देश सांगितला.
भारतासोबत गेल्या ५० वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. उर्जा, कचरा व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये भारताबरोबर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या चार क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन अशा प्रकारे सहकार्य भारतातील काही शहरांना नॉर्वे देश देणार आहे. त्या अनुषंगाने भारतातील काही शहरांना भेटी देत तेथील उद्योग आणि पर्यावरणाविषयी सखोल माहिती घेत आहेत. विशेषता प्लास्टिकचा पुर्नवापर, ई-कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, प्रक्रियायुक्त मलजलाचा पुर्नवापर, गाळ व्यवस्थापन, एनर्जी फ्रॉम ग्रीन हायड्रोजन, बायोडिझेल, बांधकाम आणि विल्हेवाट (सी अँण्ड डी वेस्ट मॅनेजमेंट) या घटकांची माहिती शिष्टमंडळ घेत आहे. त्या अनुषंगाने सहकार्याची कार्यवाही केली जाणार आहे. मनपाला भेट दिलेल्या शिष्टमंडळाला प्लास्टिकचा पुर्नवापर या क्षेत्रात जास्त रुची दिसून आली. प्लास्टिकचा पुर्नवापरचे विशेष तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याअनुषंगाने नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांशीही शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. नाशिक मनपाला कसे सहकार्य करता याबाबत नार्वेजेनियन कॉन्सल जनरल शिष्टमंडळ लवकरच राज्य शासनास कळवणार आहे.
शिष्टमंडळा बरोबरच्या बैठकीला नार्वेजियन स्पेशल मिशनचे प्रियद कुलकर्णी, मनपा अतिरीक्त आयुक्त भाग्यश्री बानायत, अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, उपअभियंता रविंद्र बागूल उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *