जिल्ह्यात अकरा ठिकाणी यंत्रणा सज्ज; उद्या निकाल
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील नगरपरिषदेसाठी सुरू असलेल्या प्रचार काल रात्री दहा वाजता संपुष्टात आला. आज मतदान प्रक्रिया पार पडणार असून, उद्या निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक केंद्रांवर कालच मतदान यंत्रे रवाना करण्यात आली. सकाळी साडे सात वाजेपासून मतदान पार पडणार आहे. अकरा नगरपरिषदांसाठी एकूण 1,028 उमेदवार नगरसेवकपदासाठी तर 56 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात होते. तथापि, सिन्नर, ओझर, चांदवड या तीन पालिकांतील सात जागांची निवडणूक स्थगित झाली आहे. तर मनमाड येथील उमेदवाराचे निधन झाल्याने येथील एका प्रभागाची प्रकिया रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदापैकी नांदगावला सात, सटाण्यात दोन आणि त्र्यंबकेश्वर येथे एक जागेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
जिल्ह्यात महायुतीमध्येच जोरदार सामना रंगला. त्या तुलनेत महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पुरेसे उमेदवारही मिळू शकले नाहीत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने महायुतीमध्येच जोरदार लढत झाली. निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याबरोबरच अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री गिरीश महाजन, नितीन बानगुडे पाटील यांच्या तोफा धडाडल्या. छगन भुजबळ यांनी थेट रुग्णालयातून येवलेकरांशी लाइव्ह संवाद साधला.
इगतपुरी, सिन्नरमध्ये चौरंगी तर सटाणा, पिंपळगाव बसवंत येथे तिरंगी, तर ओझर, येवला, नांदगाव, मनमाड, भगूर येथे दुरंगी सामना होत आहे. काही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत दुरंगीच होणार आहे. सिन्नरला भाजपा विरोधात शिंदे गट, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा सामना रंगला. सटाण्यात भाजपा विरोधात महाविकास आघाडीला फारशी ताकद उभी करता आली नाही. भगूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु या बालेकिल्ल्याला धडक देण्यासाठी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनी कंबर कसली आहे. नांदगाव व मनमाडमध्ये शिंदे गटाविरोधात अजित पवार गटाने विशेषत: समीर भुजबळ यांनी जोरदार आघाडी उभी केली आहे. येवल्यात अजित पवार गटाविरोधात शिंदे गट असा थेट सामना रंगला आहे.इगतपुरीमध्ये शिवसेनेचे संजय इंदुलकर यांनी निवडणुकीच्या तोंडावरच भाजपात प्रवेश केल्याने येथे आघाडी विरोधात भाजपा अशी लढत होत आहे.
एकूण अकरा नगरपरिषदांसाठी तीन लाख 72 हजार 543 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. त्यात एक लाख 84 हजार 619 महिला मतदार आहेत.
मतविभागणीवर विजयाचे गणित
जिल्ह्यात बहुरंगी लढती होत असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी धक्कादायक निकालही लागण्याची शक्यता आहे. एकूणच विजयाचे सर्व गणित कोण कुणाची मते खेचतो? यावर अवलंबून आहे.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
चांदवड 10
त्र्यंबकेश्वर 8
मनमाड 8
ओझर 7
पिंपळगाव बसवंत 3
सिन्नर 7
नांदगाव 2
येवला 2
भगूर 2
सटाणा 3
इगतपुरी 4
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…