सर्वच उमेदवारांची धडधड वाढली
पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटी विभागातील एक ते सहा प्रभागांमधील म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद व नांदूर येथील मतदान केंद्र वगळता इतर मतदान केंद्रांवर मतदारांची फारशी गर्दी दिसली नाही. या निवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. आपापल्या वाहनातून, काहींना रिक्षातून आणणे आणि पुन्हा सोडण्यात येत होते. दुपारनंतर मतदान केंद्रावरील गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, तितकी गर्दी वाढली नाही.
विशेष म्हणजे, फुलेनगर मनपा शाळा क्रमांक 9 परिसरात सायंकाळी 5.30 वाजेनंतर यापूर्वीच्या सर्वच निवडणुकांच्या वेळी मतदारांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असायच्या, परंतु यावेळी मात्र या भागात पूर्णतः शुकशुकाट दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर मतदान झाल्याने आता उमेदवारांची मात्र चांगलीच धडधड वाढली आहे. पंचवटीतील सर्वच प्रभागांमधील प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार व त्यांचे समर्थक उभे राहून मतदारांना हात जोडून आवाहन करीत होते. आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी सर्वच प्रभागांत मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. चुरशीच्या लढती असलेल्या केंद्रांवर उमेदवार ठिय्या देऊन उभे होते. एकाच वेळी चार मतदान करावयाचे असल्याने वयोवृद्ध व्यक्तींना ईव्हीएमचे बटण दाबताना गोंधळ उडत होता. त्यामुळे मतदानास वेळ लागत होता.
प्रभाग सहामध्ये आमदार खोसकर यांची प्रतिष्ठा पणाला
प्रभाग क्रमांक सहामध्ये आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांची कन्या इंदुमती भोये (खोसकर) यांना उभे केल्याने त्यांनी तसेच मखमलाबादचे रहिवासी असलेल्या अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही गेल्या काही दिवसांपासून या प्रभागात तळ ठोकला होता. तर आपल्या मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा त्यांनी आपल्या लेकीसाठी कामाला लावल्याचे दिसून आले. त्यांच्या कन्येसाठी त्यांनी या प्रभागात आपल्या मतदारसंघातील कोण कोणाचे नातेवाईक आहेत, याचा शोध लावत त्या नातेवाइकांना प्रभागातील मतदारांशी संपर्क करायला सांगून आपल्या लेकीला मतदान करा, असे सांगितले.
फुलेनगरात पहिल्यांदाच शांतता
प्रभाग क्रमांक चारमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या फुलेनगर परिसरात मात्र यावेळी सायंकाळी साडेपाच वाजेनंतर मनपा शाळा क्रमांक 9 च्या बाहेर पहिल्यांदाच शांतता दिसून आल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींसह पोलिसांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.
Voting peaceful throughout Panchavati division
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…