नाशिक शहर

नाशिक पदवीधरसाठी आज मतदान

 

 

१६ उमेदवार रिंगणात; ३३८ मतदान केंद्रे

 

नाशिक : प्रतिनिधी

 

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज सोमवारी (दि. ३०) मतदान होणार आहे. एकूण १६ उमेदवार रिंगणात असून, मुख्य लढत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील, स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांच्यात होणार आहे.

 

दरम्यान, प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, नाशिक विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी सकाळी ८ ते दु. ४ या वेळेत मतदान होणार आहे. प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर व शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा ने जाहिर केला. त्यांनतंर छत्रपती संभाजी राजे यांची स्वराज्य, वंचित बहुजन आघाडी असल्याने निवडणुकित चुरस पहायला मिळत आहे. प्रशासनाने मतदानाची सज्जता ठेवली असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील तयारीचा आढावा घेतला आहे. विभागात २ लाख ६२ हजार ७३१ इतके अंतिम पदवीधर मतदार आहेत. दोन फेब्रुवारीला मत मोजणी होणार आहे. नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या यापूर्वी जाहीर करण्यात आली आहे. विभागाच्या मानेने अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असून येथून ज्या उमेदवाराला अधिक मते असतील त्यासाठी 7 निर्णायक ठरू शकतात.

 

दरम्यान नगरमध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यत ३५ हजार ५८, धुळे जिल्ह्यात २३ हजार ४१२, नंदूरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ इतके मतदार आहेत.

 

सर्वाधिक मतदान केंद्रे नगर जिल्ह्यात

 

अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्रे असून, तेथील केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०. धुळ्यात २९ आणि नंदुरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.

 

राज्याचे लक्ष

 

नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीकडे विभागातीलच नव्हे राज्याचे लक्ष लागून आहे. त्यामुळे पदवीधर बंद मतपेटीतून काय कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीच्या इतिहासात एवढे नाट्य आजवर कोणी पाहिले नाही, असे द्विस्ट पाहावयास मिळाले.

 

स्थानिक भाजपाचा पाठिंबा ताबेंना

 

स्थानिक भाजपाचा पाठिंबा सत्यजित तांबे यांना जाहीर करण्यात आला असला तरी प्रदेश भाजपाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेरपर्यंत भाजपाने पाठिंब्याची घोषणा केलीच नाही. तथापि, राधाकृष्ण विखे यांनी मात्र तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

19 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago