प्रचार थांबला: विभागात 338 केंद्रांवर मतदान
नाशिक : प्रतिनिधी
नाट्यमय घडामोडींमुळे प्रारंभीपासून रंगतदार बनलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार काल सायंकाळी संपला. उद्या सोमवारी मतदान होत असून, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. याशिवाय स्वराज संघटना आणि वंचितसह इतरही उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पदवीधर मतदार संघ महाराष्ट्रात चर्चेत आला होता. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
सलग तीन वेळेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील व छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज संघटनेनेकडून सुरेश पवार रिंगणात असून, वंचितकडून रतन बनसोडे आहे.
रविवारी सकाळी 8 ते 4 वेळेत मतदान होणार आहे. नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या 147 इतकी आहे. नाशिकमध्ये 99, जळगाव जिल्ह्यात 40, धुळ्यात 29 आणि नंदूरबार जिल्ह्यात 23 मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना आतून भाजपा मदत करत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या वरिष्ठांनी त्या-त्या जिल्हयातील पदाधिकार्यांना तांबे यांना मदत करावी अशा सूचना दिल्याचे बोलले जात आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या निवडणुकीकडे लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीने उमेद्वार दिला असून ठाकरे गटाने जोर लावल्याचे चित्र आहे. सुरेश पवार यांच्यासाठी छत्रपती संभाजीराजे आले आहे. वंचितचेही रतन बनसोडे रिंगणात आहेत. काही दिवसांपासून नाशिक जिल्हयासह विभागात पदवीधर निवडणुकीचा धुराळा पहावयास मिळ्त आहे. मतदानाच्या दिवशी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. रविवारी मतदान झाल्यानंतर (दि.2) फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे रविवारी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारी 2023 रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…