लक्ष्यवेध : प्रभाग-18
कॉलनीअंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था
नाशिकरोड विभागातील जेल रोडमधील बर्याच भागांत पाण्याची समस्या गंभीर आहे. यास प्रभाग 18 ही अपवाद नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांसाठी ही समस्या गंभीर बनली आहे. अयोध्यानगर, अमृतधर, पिंपळपट्टी मळा, सद्गुरूनगर, शिवाजीनगर, सरस्वतीनगर, पवारवाडीचा काही भाग आदींसह इतर भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. मुख्य रस्त्यांसह कॉलनीअंतर्गत रस्त्यांची कमालीची दुरवस्था झाली आहे. अनधिकृत अतिक्रमणासह थेट रस्त्यांवर भाजीबाजार थाटला जात आहे. परिणामी रस्त्यांचा श्वासच कोंडला जात असल्याने वाहनधारकांची नित्याची अडचण झाली आहे.
महापालिका निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असल्याने भाजप, शिंदेसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आदी पक्षांतील इच्छुक कामाला लागले आहेत. प्रभाग 18 मध्ये समस्यांची मालिका जैसे थे असल्याचे नागरिक सांगत आहेत. गतवेळेस चारपैकी तीना जागा भाजपने मिळवत आपला दबदबा निर्माण केला होता. एका जागेवर अखंड शिवसेनेला यश मिळाले होते. प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधल्यास पंचक गोदावरी नदीकिनारी सिंहस्थासाठी 2015 साली घाटाची निर्मिती करण्यात आली. पण सध्या या घाटाचा उपयोग मद्यपी व टवाळखोरांसाठीच होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना सायखेडा मार्गाचे डांबरीकरण होणे अत्यंत आवश्यक असताना ते झालेले नाही. या मार्गावरून दररोज हजारो वाहनधारक ये-जा करतात. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाशिकरोडकडे जाणार्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. मनपाकडून वरच्यावर पॅचअप करून वेळ मारून नेली जात आहे. कॉलनीअंतर्गत नव्याने रस्ते होण्याची आवश्यकता आहे. पंचक येथे महापालिकेचे शहरी आरोग्य केंद्र आहे. पण तीन-चार वषार्ंपासून अपुर्या मनुष्यबळामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. प्रभाग 18 तील नागरिकांसाठी पंचक आरोग्य केंद्र देवदूतासारखे आहे. कोरोनामध्ये प्रभागातील हजारो नागरिकांना येथूनच लस देण्यात आली. सध्या येेथे तज्ज्ञ डॉक्टरांसह व स्टाफची कमतरता आहे.
विद्यमान नगरसेवक
विशाल संगमनेरे,
रंजना बोराडे,
मीरा हांडगे,
शरद मोरे
प्रभागाचा परिसर
पंचक गाव, गावठाण, सरस्वतीनर, सम्राटनगर, विद्यानगरी, बोबडेनगर, बालाजीनगर, सुवर्णनगर, ठाकरे मळा, कुबेर कॉलनी, शिवाजीनगर, हनुमाननगर, तुलसी पार्क, जयवंतनगर, इच्छामणीनगर, अष्टविनायकनगर, संत ज्ञानेश्वरनगर, साईनाथनगर, माळी कॉलनी, कॅनॉल रोड.
प्रभागात झालेली कामे
♦ विकसित वसाहतीत रस्ते, पथदीप, गटारकामे मार्गी लावून पाणीप्रश्न सुटण्यासाठी शिवशक्तीनगर येथे नवीन जलकुंभ.
♦ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण काम अंतिम टप्प्यात.
♦ प्रभाग सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, आमदार निधीतून वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉल.
♦ मॉडेल कॉलनीत पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी.
♦ कॅनॉल रोड भागात पाण्याची नवी पाइपलाइन.
♦ अमृतवन उद्यानाला संरक्षक भिंत.
♦ पंचक स्मशानभूमीत तीन नवीन बेड वाढवून विद्युतदाहिनी.
♦ उद्यानाचे नूतनीकरण.
स्थानिक समस्या
♦ राजराजेश्वरी चौकापासून पंचक श्री शनि महाराज मंदिरापर्यंत रस्त्यावर भरणार्या अनधिकृत भाजी बाजारामुळे रहिवासी, दुकानदारांना फटका, वाहतुकीला होतोय अडथळा.
♦ डीपी रस्त्याकडे प्रशासनाची पाठ. परिणामी पंचक-शिवरोड, अमृत उद्यान, राहुलनगर, ब्रिजनगर परिसराचे काम रखडले.
♦ पथदीपांची समस्या.
♦ पंचक मैदानावरील जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था.
♦ ग्रीन जिमची दैना.
♦ अमृतवन उद्यान वगळता नागरिकांसाठी दुसरे उद्यान नाही.
भाजपकडून उमेदवारांच्या कार्याचे मूल्यमापन
सन 2017 च्या निवडणुकीत भाजपने प्रभागात वर्चस्व गाजवत तीन जागा निवडून आणल्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपने शंभर प्लसचा नारा दिला असून, प्रभाग 18 तील चारही जागांवर त्यांचा डोळा असल्याने पूर्ण ताकदीनिशी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उमेदवारी देताना पक्षात कोण सक्रिय अन् कोण निष्क्रिय याचा लेखाजोखा केला जाणार आहे. पक्षाच्या मेरीटमध्ये अनुत्तीर्ण होेणार्यांचे तिकीट कापले जाणार आहे. विशेषत: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील कामाचेही
मूल्यमापन होणार आहे. याद्वारे काहींचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार असल्याची चर्चा भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांत आहे. आमदार राहुल ढिकले यांच्या खांद्यावर मनपा निवडणुकीची जबाबदारी टाकल्याने त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात येणार्या नाशिकरोड विभागात शत-प्रतिशत पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
इच्छुक उमेदवार
विशाल संगमनेरे, रंजना बोराडे, मीराबाई हांडगे, शरद मोरेे, सुनील बोराडे, योगेश निसाळ, सुनीता भोजने, सागर भोजने, संतोष कांबळे, संतोष पिल्ले, रोहिणी पिल्ले (वाघ), शिवा ताकाटे, शीतल ताकाटे, अशोक सातभाई, वंदना बोराडे, मंदा फड, विलासराज गायकवाड, शिवा गाडे, विक्रम पोरजे, रतन बोराडे, प्रवीण बोराडे, प्रशांत भालेराव, संजय ढिकले, नीलेश गांगुर्डे, हेमंत कांबळे, रूपाली पठारे, सुरेखा निमसेे, अरुण माळवे, सुनील निरभवणे, कमोदिनी बाराते, राजेंद्र बोराडे, नंदकिशोर बोराडे, अॅड. नीलेश सानप, अरुण ढिकले, अॅड. मिलिंद मोरे, साधना पोरजे, सोनल ढिकले, भानुदास चुगे.
दुभंगलेल्या शिवसेनेची पहिलीच निवडणूक
सन 2017 मध्ये शिवसेना निवडणुकीला सामोरी गेली होती. मात्र, पक्ष दुभंगल्यानंतर प्रथमच दोन्ही सेना महापालिका निवडणुकीला सामोर्या जात आहेत. प्रभाग 18 शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. येत्या निवडणुकीत दोन्ही सेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल.
प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी अस्वच्छतेचीही समस्या आहे. याशिवाय राजराजेश्वरी ते शनि मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर भाजीबाजार बसत असल्याने वाहनधारकांची व स्थानिक नागरिकांची अडचण होते. बाजारामुळे अपघात होण्याची भीती आहे.
– नितीन बोराडे, नागरिक
कॉलनीअंतर्गत रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे. पाणी पुरवठ्याच्या समस्येतून नागरिकांना सुटका कधी मिळणार? अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अनेकदा पथदीप बंद असतात. कचर्याचे ढीग परिसरात दिसतात. यावर कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.
– बाळासाहेब देसाई, नागरिक
– विनोद शिंदे, नागरिक
2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या ः 44 हजार 149
अनुसूचित जाती ः 9 हजार 568
अनुसूचित जमाती ः 3 हजार 244
भाजप- शिंदेसेनेत कुस्ती
राज्यातील सत्ताधारी भाजप व शिंदेसेना स्थानिक स्वराज्य संस्थेत (नगरपालिका) स्वबळावर निवडणूक लढत आहे. आता नाशिक महापालिका निवडणुकीतही दोन्ही पक्ष आमनेसामने येणार आहे. एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा निवडणुकीचे वातावरण तापणार असून, प्रभाग 18 मध्ये भाजप व शिंदेसेना समोरासमोर येणार असल्याने आतापासूनच हवा तयार होत आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…