मुंबई : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज शनिवारी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यता आला होता. संगीत क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत संदिग्धता आहे. अलिकडेच त्यांनी पार्श्वगायनाच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केली होती. 18 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. दहा हजारांहून अधिक गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.