नाशिकमध्ये घर घेण्याची इच्छा

 

 

नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनात मुलाखतप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केल्या भावना..

 

नाशिक: प्रतिनिधी  नाशिक शहराचे वातावरण इतके सुंदर आणि मनमोहक आहे की, या शहराच्या कोणीही प्रेमात पडू शकते. त्याचप्रमाणे सध्या होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांच्यामार्फत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बघून मलाही नाशिकमध्ये घर घेण्याचा मोह होतो, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केले.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि. २३ रोजी सांयकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्राजक्ता यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

याप्रसंगी व्यासपीठावर नरेडकोचे नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश टक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे

सहसमन्वय शंतनु देशपांडे व असावरी देशपांडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, मुंबईमध्ये आता घर घ्यायला जागा नाही, पुण्यातही प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांचा ओढा नाशिककडे दिसून येतो. त्यातच इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. तसेच येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत अल्हाददायक

असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो. त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन येथे राहायला आवडेल, असेही प्राजक्ता त्यांनी सांगितले. तसेच पहिल्यांदाच मी इतके मोठे प्रदर्शन बघितले असून नरेडकोच्या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदी करणारे ग्राहक यांच्यामध्ये एक चांगला दुआ तयार होईल, असेही त्या म्हणाल्या.

तसेच घरातील स्त्री ही कुटुंबाचा कणा असते, याची सर्वांनी जाणीव ठेवावी, ज्याप्रमाणे घरात आपण सर्व सोयी सुविधा बघतो, त्याचप्रमाणे घरातील नातेसंबंध जपणे देखील महत्त्वाचे असतात आणि घरातील नातेसंबंध, संस्कार, सर्वांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या गोष्टींसाठी घरातील स्त्री ही दिवसभर राबत असते. त्यामुळे सर्वांनी घरातील स्त्रियांची काळजी घ्यायला हवी, तसेच स्वतः स्त्रियांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असेही प्राजक्ता माळी यांनी मत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र,

नाशिकमधील गोदाघाट, येथील मिसळ, अशा सर्व गोष्टींचे आपल्याला आकर्षण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे यावेळी प्राजक्ता माळी यांनी सांगितले की, मी स्वतः योगा, प्राणायाम आणि ध्यान या त्रिसूत्रींचे पालन करते. त्यामुळेच माझे आरोग्य चांगले असून कोणत्याही प्रकारचा ताणतणाव मनावर जाणवत नसतो, नैराश्य देखील येत नाही, यासाठी प्रत्येकानेच योगा, प्राणायाम आणि ध्यानधारणा करायला हवी, असेही प्राजक्ता यांनी सांगितले.

यावेळी प्राजक्ता माळी यांनी पुढे सांगितले की, बालपणापासून मी कविता करत असून माझा एक कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनय, निवेदन आणि कविता या संदर्भात महाराष्ट्रभर माझे चाहते असून त्या सर्वांचे मला प्रेम मिळाले आहे, इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून अनेक विविध वस्तू देखील मिळाल्या आहेत. इतकेच नव्हे तर काही चाहात्यांनी तर त्यांच्या हातावर माझ्या नावाचा ( प्राजक्ता ) टॅटू देखील काढला आहे असा किस्सा प्राजक्ता यांनी सांगितला. यापुढे हिंदी चित्रपटात देखील मला काम करायला आवडेल, परंतु हिंदीमध्ये काम करणे मराठी कलाकारांसाठी थोडीशी अवघड गोष्ट असते तसेच चित्रपट हे माध्यम मालीकेपेक्षा थोडेसे कठीण वाटते, असेही प्राजक्ता यांनी स्पष्ट केले.

रानबाजार या वेब सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला परंतु त्याआधी ट्रिझर प्रसिद्ध झाला, तेव्हा काही चुकीच्या कॉमेंट आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेत काम करताना अत्यंत छान वातावरण असते, असे सांगून त्यांनी ही मालीका म्हणजे माझे संचित आहे, यामध्ये काम करताना नेहमी आनंद वाटतो, असे सांगितले.

दरम्यान, यावेळी त्यांचे सहकलाकार व अभिनेता अंशुमन विचारे आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर यांच्या प्राजक्ता माळी यांच्या विषयी व्यक्त केलेल्या भावनांच्या ध्वनीफित दाखवण्यात आली. यावेळी रॉपीड फायर राउंडमध्ये विचारलेल्या प्रश्नांनाही प्राजक्ता माळी यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृहप्रकल्पांची माहिती घेतली.

प्रारंभी प्राजक्ता माळी यांचा पैठणी देऊन तसेच चांदीची भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश टक्कर आणि सुनील गवादे यांनी नारेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्राजक्ता माळीच्या हस्ते पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राजक्ता माळी यांच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर यांनी केले. आभार प्रदर्शन शंतनु देशपांडे यांनी केले.

Ashvini Pande

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

2 hours ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

2 hours ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

2 hours ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

2 hours ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

2 hours ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

3 hours ago