व्यावसायिक गॅसही बंद होणार?
मुंबई : इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या झळा आता भारतातही जाणवू लागल्या आहेत. संभाव्य गॅस तुटवड्याचा विचार करून राज्य सरकारने गॅसचा वापर कमीत कमी करण्यावर भर देत उद्योगांसाठी लागणार्या 47 किलो आणि 450 किलो क्षमतेच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नयेत, अशा सूचना डीलर्सना देण्यात आल्या आल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांट येथून डीलर्सना सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्लांट प्रशासनाने डीलर्सना व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी गाड्या पाठवू नयेत, तसेच नव्या ऑर्डर स्वीकारू नयेत, असे निर्देश दिले आहेत. व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध असणारे 5, 19, 35, 47 आणि 427 किलो क्षमतेचे सिलिंडर सध्या पुरवठ्यासाठी थांबवण्यात आले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स तसेच विविध उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील दोन दिवसांत व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
घरगुती गॅसला प्राधान्य
सरकारकडून घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. कारण युद्धामुळे आखाती देशांमधील ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील ऊर्जा बाजारावर किती काळ जाणवेल, याकडे उद्योग आणि व्यापारीवर्गाचे लक्ष लागले आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…