नाशिकमध्ये होणार वारकरी स्नेह संमेलन

 

नाशिक : प्रतिनिधी

श्रीराम सार्वजनिक वाचनालय, संत ज्ञानेश्‍वर अभ्यासिका पंचवटी, माय माऊली भजनी मंडळ,  सती माई महिला वारकरी मंडळ ट्रस्ट पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय वारकरी स्नेह संमेलन रविवार दिनांक 8 रोजी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 8 ते 5 या वेळेत होणार्‍या या संमेलनाला केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाला किमान पाच हजारावर वारकरी उपस्थित राहतील, असा अंदाज संमेलन समितीचे पुंडलिकराव थेटे यांनी वर्तविला आहे.

गणेशवाडी येथील श्रीराम विद्यालयाच्या पटांगणात हे संमेलन होणार असून, संमेलनासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत माजी आमदार बाळासाहेब सानप, त्र्यंबकराव गायकवाड,  माणिकराव देशमुख,  भरतानंद सांगळे,  मच्छिंद्र सानप,  सुरेश मगर,  हरिकृष्ण सानप,  कैलास वेलजाळी, ज्ञानेश्‍वर माऊली जय्यतमहाल यांचा समावेश आहे.

संमेलनाचे उदघाटन सकाळी होईल. 9 ते 10 गंगाधर महाराज कवडे यांचे कीर्तन, सकाळी 10 वाजात विठ्ठल रुक्मिणी पूजन, सकाळी 10.45 वाजता चर्चासत्र, दुपारी 1ते2  स्नेहभोजन, दुपारी 2 ते 4.30  चर्चासत्र, दुपारी 4.40 ते 5 वारकरी संप्रदयासाठी विशेष कार्य करणार्‍या सन्मानीय व्यक्तींना वारकरी भूषण पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *