नाशिक

वनक्षेत्रात वन्यप्राण्यांना पाण्याची व्यवस्था

राजापूर-ममदापूर क्षेत्रात पाणवठ्यांमध्ये टाकले पाणी

नगरसूल : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील पूर्वभागात राजापूर-ममदापूर राखीव व संवर्धन क्षेत्रामध्ये वन विभागातर्फे कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. पाणवठ्यांमध्ये पाणी टाकून वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनविभागाने केली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे संचार कमी झाला आहे.
सध्या मार्च महिना सुरू असून, कडक ऊन आहे. त्यामुळे राखीव व संवर्धन क्षेत्रातील भागात वॉटर हॉल व कृत्रिम पाणवठे तयार केले, तर काही ठिकाणी सोलरच्या सहाय्याने पांढरे पाणी टाकले जातेे. नाशिक वन विभाग पूर्व भाग येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब माळी, ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर, वनरक्षक गोपाल राठोड, वनरक्षक पंकज नागपुरे, वनसेवक आप्पा वाघ, मनोहर दाणे, मच्छिंद्र ठाकरे, सोमनाथ ठाकरे व वनमजूर या पाणवठ्यात पिण्याचे पाणी आहे की नाही, यावेळी वेळोवेळी लक्ष देत असून, वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची तीव्रता व कमतरता भासू नये, यासाठी काही ठिकाणी टँकरने पाणी टाकण्यात येत आहे. तालुक्यातील पूर्व भाग डोंगराळ असून, त्यात राजापूर-ममदापूर खडकामाळ, माळरानावर हरिण, काळवीट यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळतो. यावर संरक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने हरिण, काळवीट, मोर, तरस, लांडगे, कोल्हे, ससे अशी अनेक वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था झाल्याने मानवी वस्तीत या प्राण्यांचा संचार कमी झाला आहे.

राखीव व संवर्धन क्षेत्रात कृत्रिम पाणवठे असून, त्यात टँकरद्वारे पाणी टाकले जाते, तर काही ठिकाणी सौरऊर्जेवर बोअरवेल्स असून, वॉटर हॉलमध्ये पाणी टाकले जात आहे. त्यामुळे वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था झाली आहे.
-गोपाल राठोड, वनरक्षक, राजापूर

Water arrangement for wild animals in forest areas

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago