जल हेच बनले ’ती’च्यासाठी जीवन!

संगीता चारोस्कर यांची जगण्याची लढाई

दुःख आणि अपत्यांच्या काळजीतूनही हार न मानता संगीता चारोस्कर यांनी पाण्याच्या व्यवसायातून आर्थिक स्वावलंबन साधले आहे. मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून, त्यांनी समाजातल्या अनेक महिलांसाठी स्वतःवर विश्वास ठेवण्याचे संदेश दिले आहेत. संगीता चारोस्कर, दरी-मातोरी येथे राहणार्‍या. गेल्या काही वर्षांत आयुष्यातील मोठ्या संकटांचा सामना करत आहेत. कोरोनाच्या काळात 17 वर्षांच्या मुलासह पतीचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर सहावी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्याी संगीता, आर्थिक आणि मानसिक आव्हानांसमोर उभ्या राहिल्या. मजुरी करून उदरनिर्वाह करत असताना, पतीच्या पाण्याच्या व्यवसायाचे काम सांभाळण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. समाज एकल महिलेला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो, पण मी कोणालाही न घाबरता पुढे चालत राहिले आणि मागे वळून पाहिले नाही, असे त्यांनी सांगितले. कृष्णा अ‍ॅक्वा या पाण्याच्या व्यवसायास त्यांनी सुरुवात केली. आज त्या दरी-मातोरीत नागरिकांना पाणी पुरवतात. व्यवसाय गावापुरता मर्यादित आहे, तरीही आठ ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे त्या सांगतात. मुलगी अकरावीला आहे. तिला चांगले शिक्षण देऊन तिच्या पायावर उभे करणार आहे. जरी मी कमी शिकलेली आहे, तरी संकटामुळे शिक्षणाचे महत्त्व मला समजले आहे. शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. ग्रामपंचायतीकडून अजून सहकार्य मिळाले नसल्याचे सांगत किमान शासनाची काही मदत मिळावी यासाठी त्या ग्रा.पं.मध्ये पाण्याच्या टाकीसंदर्भात पाठपुरावा करीत आहे. समाधानकारक काम झाले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

Water became life for her!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *