एकवेळ पुरवठा; नगरसेवकांचा निर्णयाला विरोध
नाशिक : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी निलगिरी बाग येथील जलकुंभातून द्वारका परिसरातील प्रभाग 15 मधील पाणीपुरवठा भाजप नगरसेविका प्रियंका माने व त्यांचे पती पप्पू माने यांनी बंद केला होता. त्यानंतर उद्धव सेनेच्या नगरसेविका सीमा पवार निलगिरी बाग येथील जलकुंभावर गेल्या असता, तेथे पवार व माने यांच्यात पाणी सोडण्यावरून जोरदार खडाजंगी झाली होती. त्याचे पडसाद महासभेत उमटले होते. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने सोमवार(दि.16)पासून द्वारका परिसरात एकदाच पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयविरोधात प्रभाग 15 मधील नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पंचवटीतील प्रभाग 3 मध्ये जलकुंभ असूनही येथील नागरिकांना एकवेळचे पाणी मिळत नसल्याचा आरोप प्रियंका माने यांनी केला होता. द्वारका भागात दोन वेळा पाणी देऊन पंचवटीतल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे म्हटले होते. नगरसेविका सीमा पवार यांनी द्वारकेच्या प्रभाग 15 मध्ये सहा एमएलडी पाणीपुरवठा होतो. तो अत्यंत कमी असून, त्यात आणखी चार एमएलडीने वाढ करून तो दहावर करण्याची मागणी महासभेत केली होती. तसेच द्वारका परिसतील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबत बोलले जात असताना ’हा भाग पाकिस्तानमध्ये आहे का?’ असे त्यांनी सुनावले होते. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने द्वारका परिसराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याने याचा फटका येथील नागरिकांना बसणार आहे. आता निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावरून नाशिक पूर्व प्रभाग 15 मधील द्वारका व गोडेबाबा जलकुंभ येथून होणारा दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा हा दिवसातून एकवेळ करण्याचे प्रारूप स्वरूपात नियोजन करण्यात आले आहे.
वरील वेळापत्रकाची अंमलबजावणी चाचणी आजपासून (दि. 16 मार्च) करण्यात येणार आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार पुढील बदल करण्यात येतील. तरी परिसरातील नागरिकांनी नियोजित वेळेबाबत नोंद घ्यावी, असे आहावन केले आहे.
द्वारका जलकुंभ (पुरवठा वेळ : सकाळी 6.30 ते 9.00)
परिसर : टाकळी फाटा, संत गाडगे महाराज वसाहत, टाकळी फाटा रोड, श्रीराम सोसायटी, शंकरनगर, माणेकशानगर संपूर्ण, रवींद्र शाळा, सिद्ध गौतम सोसायटी, रंगूबाई जुन्नरे शाळा, वसंत बहार सोसायटी, नावीन्य सोसायटी, मधुबन सोसायटी, बोडके प्लाझा, हनुमान मंदिर काठे गल्ली सिग्नल, बनकर चौक, त्रिकोणी गार्डन, सिटी केअर हॉस्पिटल, बनकर मळा, पूना रोड.
गोडेबाबा जलकुंभ (पुरवठा वेळ : सायं. 5.00 ते 7.00)
परिसर : महादेव मंदिर, महाजन बिल्डर्स सोसायटी, आनंदवन सोसायटी, गणेशनगर स्वामी समर्थ केंद्र, त्रिकोणी गार्डनच्या मागे, काठे लेन 1, काठे लेन 2, काठे लेन 3 व काठे गल्ली, 100 फुटी रोड स्वामी समर्थ सोसायटी, चेतना हॉस्पिटलच्या मागे, जय शंकर टॉवर, अनुसयानगर संपूर्ण, सुनंदा सहनिवासमागे, महात्मा जोतिराव फुले सोसायटी, काठे गल्ली, अक्षर इस्टेट सोसायटी.
याविरोधात आवाज उठवणार
आतापर्यंत प्रभाग 15 तील नागरिकांना दोन वेळा पाणीपुरवठा केला जात असताना चाचणीच्या (ट्रायल बेस) नावाखाली आता एकच वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, याची कोणतीही आवश्यकता नसताना हा निर्णय कसा काय घेण्यात आला? प्रभाग 15 मधील लोकसंख्येचा विचार करता येथे एकवेळचे पाणी पुरणार नाही. ते अडचणीचे ठरणार असल्याने याविरोधात आम्ही आवाज उठवू.
– प्रथमेश गिते, नगरसेवक, प्रभाग 15Water emergency in Dwarka area from today
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…