पालिकेकडून ठेकेदाराला नोटीस : प्रत्यक्षात कारवाई कधी
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून वॉटर ग्रेस ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वेतनासाह विविध कराणांमुळे ढगधग होती. शनिवारी या ठेकेदाराकडून थेट कामगारांना मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ठेकेदाराविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची दखल पालिकेने घेत वॉटर ग्रेस ठेकेदाराला नोटीस धाडून 24 तासात उत्तर देण्यास सांगितले. यानंतर ठेकेदाराने त्याचे उत्तरही धाडले आहे. दरम्यान पालिकेने या प्रकरणी ठोस भूमिका घ्यावी आणि दोषी असलेल्या ठेकेदारवावर कारवाई करण्याची मागणी होते आहे. त्यामुळे पालिका याप्रकरानात केवळ वेळ काढुपणा करू नये. अशी ही भावना कामगारांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा : मनपा, जि,प.च्या निवडणुकीचे बिगुल वाजणार
पूर्ण वेतन न देणे, बोनस न देणे आणि आयडी ब्लॉक करण्याची धमकी देणे असे प्रकार ठेकेदाराकडून सुरु असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. आता कामगारांची खदखद बाहेर आली आहे. महापालिका प्रशासनाने वॉटर ग्रेस ठेकेदाराला नोटीस बजावून 24 तासात उत्तर मागितले आहे. ठेकेदाराने त्याचा जबाब महापालिकेला दिला आहे. उत्तर समाधानकारक नसल्यास तर कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासन मवाळ भूमिका घेते आहे का असा सवाल विचारला जातोय. सेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन लावण्याचा निर्णय घेतला होता. यामुळेच सेवकांना मारहाण झाल्याचे आरोप देखील करण्यात आला आहे. मुळ वेतन न देता त्याच्यातून कपात करण्यात येते, त्याचप्रमाणे कामावर घेताना देखील पंधरा हजार रुपये घेण्यात आल्याचे आरोप सेवकांनी केले आहे. त्याचप्रमाणे नियमानुसार पगार तसेच सुविधा यांची मागणी केल्यास त्यांच्या आयडी ब्लॉक करण्याचे धमक्या देण्यात येतात.
ठेकेदाराला दिलेल्या नोटीसातून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. वॉटर ग्रेस ठेकेदाराला नोटीस देण्यात येऊन झालेल्या प्रकाराबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. याप्रशनी खुलासा आला असून त्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
– डॉ. आवेश पलोड, संचालक घनकचरा विभाग मनपा
हेही वाचा : नुतन मनपा आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वीकारला पदभार
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…