धरण समूहात 55 टक्के साठा
नाशिक : प्रतिनिधी
मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र झाल्याने जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पातळीत घट होत आहे. जिल्ह्यातील धरण समूहात 39,355 दलघफू म्हणजे 55 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाच्या झळांनी झपाट्याने पाणीपातळीत घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसणार नाही अशी आशा होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण समूहात 8 टक्के अधिक साठा शिल्लक असल्याने मागील वर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात 3,667 दलघफू म्हणजे 65.13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिक वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी दिवसागणिक पाणीपातळीत घट होत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाची दाहकता अधिक असून, नाले, ओढे कारडे पडत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील चार गावांचे टँकरसाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच टँकरफेर्या सुरू होणार आहेत.
प्रमुख धरण समूहातील पाणीसाठा
गंगापूर धरण समूहात 7,076 दलघफू म्हणजे 69.60 टक्के, पालखेड धरण समूहात 4,029 दलघफू म्हणजे 48.39, ओझरखेड धरण समूहात 20,18 दलघफू म्हणजे 62.91, दारणा धरण समूहात 13,531 दलघफू म्हणजे 56.72 टक्के, भोजापूर-257 दलघफू म्हणजे 71.19 टक्के, गिरणा खोरे समूह 11,343 दलघफू म्हणजे 49.48 टक्के, पुनंद धरण समूहात 1,101 दलघफू म्हणजे 67.15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रकल्प संख्या क्षमता आजचा उपयुक्त पाणीसाठा टक्के
मोठे प्रकल्प- 07 48,004
मध्यम प्रकल्प- 19 22,615 39,355 55.73
एकूण- 26 70,619