नाशिक

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा

नाशिक : प्रतिनिधी
मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र झाल्याने जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पातळीत घट होत आहे. जिल्ह्यातील धरण समूहात 39,355 दलघफू म्हणजे 55 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाच्या झळांनी झपाट्याने पाणीपातळीत घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसणार नाही अशी आशा होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण समूहात 8 टक्के अधिक साठा शिल्लक असल्याने मागील वर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 3,667 दलघफू म्हणजे 65.13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिक वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी दिवसागणिक पाणीपातळीत घट होत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाची दाहकता अधिक असून, नाले, ओढे कारडे पडत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील चार गावांचे टँकरसाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच टँकरफेर्‍या सुरू होणार आहेत.

प्रमुख धरण समूहातील पाणीसाठा

गंगापूर धरण समूहात 7,076 दलघफू म्हणजे 69.60 टक्के, पालखेड धरण समूहात 4,029 दलघफू म्हणजे 48.39, ओझरखेड धरण समूहात 20,18 दलघफू म्हणजे 62.91, दारणा धरण समूहात 13,531 दलघफू म्हणजे 56.72 टक्के, भोजापूर-257 दलघफू म्हणजे 71.19 टक्के, गिरणा खोरे समूह 11,343 दलघफू म्हणजे 49.48 टक्के, पुनंद धरण समूहात 1,101 दलघफू म्हणजे 67.15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रकल्प संख्या क्षमता आजचा उपयुक्त पाणीसाठा टक्के
मोठे प्रकल्प-           07 48,004
मध्यम प्रकल्प-      19 22,615 39,355 55.73
एकूण-                   26 70,619

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

1 hour ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

2 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

2 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

2 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

2 hours ago

दहा लाखांच्या आतील कामे ऑफलाइन निविदा प्रक्रियेद्वारे द्यावीत

स्थायी सदस्य भारती ताजनपुरेंची मागणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेने यापुढे दहा लाखांच्या आतील कामे…

2 hours ago