नाशिक

बावीस गावांचा पाणीपुरवठा सहा महिन्यांपासून ठप्प

तहसील कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा; ठेकेदाराचे दोन दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मनेगावसह 22 गावे पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहिनी तुटल्याने सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. कृत्रिम टंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.

दरम्यान, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी ठेकेदाराशी चर्चा करून दोन दिवसांत जलवाहिनी दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. ठोस कारवाई न झाल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लासलगावविंचूर घोटी मार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामादरम्यान मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजनेची दापूर ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सुमारे दीड किलोमीटर जलवाहिनीचे नुकसान झाले आहे. परिणामी मनेगाव, धोंडवीरनगर, रामनगर, पाटोळे, दोडी, गोंदे, भोकणी आदी गावांमध्ये पाणीपुरवठा बंद आहे.
काही गावांत नागरिकांना 200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत असून वीजबिल थकबाकीमुळे महावितरणकडून वीजजोडणी खंडित करण्यात आली आहे. शासनाचे 50 टक्के अनुदान बंद झाल्याने तसेच पंधराव्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्याबाबत अनिश्चितता असल्याने प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.
मनेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजाराम मुरकुटे, सरपंच सुनीता सोनवणे, उपसरपंच भालेराव तसेच पाटोळेचे सरपंच सुनील सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.17) तहसील कार्यालय हंडा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात मनिषा सोनवणे, माधुरी कांडेकर, निकीता शिंदे, सुरेखा वाघचौरे, गंगूबाई मांडे, जनाबाई सोनवणे, जयश्री आंबेकर, मंदा मडके, शोभा भालेराव, लता गायकवाड, मंगल मुरकुटे, उषा मुरकुूटे, सुशीला भालेराव, सुनिता मांडे, अनिता मुरकुटे, छाया सोनवणे, सविता पुंडे, स्वाती सोनवणे, रंजना सोनवणे, विजया मुरकुटे, सचिन पवार, संजय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

चार गावांचा पाणीप्रश्न बिकट

मनेगावसह बावीस गावांच्या योजनेत समाविष्ट असलेल्या इतर गावांना स्थानिक स्रोत असल्यामुळे त्यांना योजनेची जलवाहिनी फुटली तरी फारशी टंचाई जाणवली नाही. मात्र, मनेगाव, पाटोळे, धोंडवीरनगर या चार गावांचा पाणीप्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे येथील संतप्त महिलांनी हंडा मोर्चासाठी पुढाकार घेतला होता.

Water supply to twenty-two villages has been cut off for six months

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago