नाशिक

वृक्षवल्ली आम्हा सोयरे… पण तपोवनात साधुग्राम परंपरा

समन्वयाने मार्ग काढा : प्रमुख आखाड्यांच्या महंतांची भूमिका

नाशिक : प्रतिनिधी
तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावरून नाशिक शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांसह पर्यावरणप्रेमी नाशिककरांकडून वृक्षतोडीला कडाडून विरोध करण्यात येत आहे. मात्र, या वृक्षतोडीच्या मुद्यावर साधू-महंतांनी अद्याप जाहीरपणे आपली भूमिका मांडलेली नाही. साधू-महंतांनी तपोवनातील वृक्षतोडीबाबत सावध भूमिका घेतली आहे.

दरम्यान, तपोवनात रोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून, प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. साधुग्रामला किंवा कुंभमेळ्याला विरोध नाही, पण वृक्षांची कत्तल करून साधुग्राम निर्मितीस विरोध असल्याचा सूर सर्व स्तरांतून उमटत आहे. त्यामुळे याबाबत शासन, प्रशासन कशापद्धतीने मार्ग काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनात असलेल्या 1800 झाडांवर महापालिकेने मार्किंग केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांचा बळी देऊन साधुग्राम उभारू नये, अशी भूमिका नाशिकमधील अनेक पर्यावरणवाद्यांनी घेतल्यानंतर हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. राज ठाकरे यांनी तर ही जागा कोणत्या उद्योजकाच्या घशात घालणार असेल तर मनसे विरोध करेल, असे ट्विट केले. उबाठाचे उद्धव ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध केला. सयाजी शिंदे यांनी तपोवनात भेट देऊन केलेल्या वक्तव्यामुळे तर साधू-महंत कमालीचे संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख साधू-महंतांची भूमिका जाणून घेतली असता, त्यांनी या प्रश्नावर थेट बोलणे टाळतानाच यातून समन्वयाने मार्ग काढावा, असा सूर आळविला आहे. त्यामुळे साधुग्राम कसे उभे राहणार? याकडे लक्ष लागले आहे.

प्रमुख साधू-महंतांची सावध भूमिका

तपोवानातील वृक्षतोडीबाबत प्रमुख आखाड्यांच्या साधू-महंतांनी सावध भूमिका घेतली आहे. शासन व प्रशासनच यावर तोडगा काढून मार्ग काढतील, या मुद्यावर आम्ही प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 

आम्हाला साधुग्रामसाठी जागा हवी आहे. साधुग्रामसाठी साधू-महंतांना कशी जागा द्यायची, याबाबत महानगरपालिकेने तोडगा काढावा. या आधीच्या कुंभमेळ्याला तिथेच जागा दिली होती, ही परंपरा आहे. त्यामुळे प्रशासनाने ही परंपरा टिकवण्यासाठी योग्य तो मार्ग काढत साधुग्राम तयार करावे.

– महंत रामस्नेहीदासजी

वृक्षतोड झाली नाही. वृक्षतोड झाली नाही पाहिजे. परंतु, विकास करताना समूळ झाडे काढून दुसर्‍या ठिकाणी जर लावता येणार असतील तर त्या परिसराचा विकास व्हायला पाहिजे. कुंभमेळ्यासाठी करोडो भाविक येणार आहेत. त्यामुळे त्यांची व्यवस्था चांगली व्हायला हवी. शासन, प्रशासन योग्य निर्णय घेईल. कमीत कमी वृक्ष तोडून जर मार्ग निघणार असेल तर आमचे समर्थन आहे. पण वृक्ष तोडूच नये म्हणाल तर हिंदू धर्माला विरोध केल्यासारखे होईल. अंत्ययात्रेला बांबू लागतो, होमहवनाला समिधा लागतात. त्यामुळे पर्यावरणाच्या आड हिंदू धर्मावर घाला घालण्याचे काम केले जात आहे.
-महंत अनिकेत शास्त्री (महाराष्ट्र प्रदेश प्रमुख, अखिल भारतीय संत समिती धर्मसभा

हिंदूंच्या सणांना व हिंदूंच्या कार्यक्रमांना विरोध करायचा हा कार्यक्रम काही लोकांचा ठरलेला आहे. त्यांच्या धोरणानुसार ते हिंदूंच्या सणांना विरोध करत असतात. तपोवनातील जागेत आजपर्यंत साधुग्राम झाले आहे. या जागेशी साधूंची भावना जोडलेली आहे. आंदोलनकर्त्यांना तिथे कोणती झाडे आहेत हेदेखील माहिती नाही.
– महंत सुधीरदास पुजारी

कुंभमेळा हा हरित कुंभ झाला पाहिजे. कुंभमेळा आणि वृक्षसंपदा दोन्ही आवश्यक आहे. संस्कृती रक्षणासाठी कुंभमेळा होणे गरजेचे आहे. काही लोक साधू-महंतांचा अपमान करत आहेत. हे अत्यंत क्लेशदायी आहे. शासन व प्रशासनाने समन्वयाने मधला मार्ग काढत या प्रश्नावर तोडगा काढावा. – डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago