नाशिक

हरित आणि सुंदरबरोबरच सर्वांत स्वच्छ नाशिक बनविणार

राष्ट्रवादी-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीचा वचननाम्यात निर्धार

नाशिक शहरात वृक्षतोड न करता विकास केला जाईल, असा पुनरुच्चार युतीच्या नेत्यांनी केला आहे. नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी जाहीरनाम्यात ठोस उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. गोदावरीच्या उपनद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या नद्यांचे ‘अक्विफर मॅपिंग’ करून त्यांना बारमाही वाहते केले जाईल. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून गोदावरी आणि नंदिनीला प्रदूषणमुक्त केले जाईल. गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी बांबूची लागवड करून नैसर्गिक तटबंदी निर्माण केली जाईल, असेही युतीच्या नेत्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत मध्य प्रदेशातील इंदूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे. मात्र, आगामी काळात नाशिकला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविले जाईल. त्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवून कचर्‍याचे संकलन केले जाईल. नाशिक शहरातील रस्त्यांवर सध्या खूप खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणे, महापालिकेचा कारभार ऑनलाइन आणि पारदर्शक करणे, फाळके स्मारकाचे रूपडे बदलणे, तारांगणाला पुनरुज्जीवित करणे, शहरात बस आणि रिक्षा सेवेचा दर्जा वाढविणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे, झोपडपट्टीमुक्त शहर करणे, नाशिकला आयटी पार्क कार्यान्वित करणे आदी बाबींचा वचननाम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सिंहस्थासाठी हे करणार
नाशिक विमानतळावर दुसरी धावपट्टी, टर्मिनल 2, इमिग्रेशन चेक पोस्ट, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉरमध्ये हवाई वाहतूक प्रस्तावित करणे, नाशिक शहरासह जिल्ह्यात मोबाइल टॉवर्स 5 जी करणे, एसटीच्या 500 बसेस उपलब्ध करणे, डबल डेकर 50 ई-बस प्रस्तावित करून नाशिक कुंभमेळा 2027 मध्ये सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहित करणे, त्र्यंबकेश्वरला डॉपलर वेदर रडार उभारणे, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा विकास, मनमाड-कसारा तिसरा व चौथा रेल्वेमार्ग, 200 खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आदी कामे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केली जाणार असल्याचे वचननामामध्ये नमूद करण्यात आले आहे.

We will make Nashik the cleanest, greenest and most beautiful.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago