प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी देऊ : सुनील केदार

पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग सहा हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने येथील समस्यादेखील जास्त आहेत. प्रभाग सिंहस्थाच्या दृष्टीनेदेखील मोठा असल्याने या प्रभागासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलून या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केले.

मखमलाबाद ग्रामस्थांच्या वतीने क्रांतिवीर वसंतराव नाईक मंगल कार्यालयात प्रभाग सहाचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद पालवे, वाळू पहिलवान काकड, रोहिणी पिंगळे व चित्रा तांदळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ पंढरीनाथ काकड होते. केदार पुढे म्हणाले की, महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असल्याने महापौरदेखील भाजपचाच होणार आहे. त्यामुळे निधीला कुठल्याही प्रकारे कमतरता भासणार नाही. या प्रभागातील समस्या मोठ्या आहेत. मुख्य रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याने या भागातील मुख्य असलेला ड्रीम कॅस्टल ते गामणे मळा तसेच दत्त चौक ते मखमलाबाद रोड या रस्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. यावेळी प्रा. बाळासाहेब पिंगळे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, निवृत्ती महाले, सुभाष तिडके, सुरेश तांदळे, क्रांतिवीर वसंतराव नाईक मंगल कार्यालयाचे अध्यक्ष गणपतराव काकड यांनी नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद पालवे, वाळू पहिलवान काकड, रोहिणी पिंगळे, चित्रा तांदळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी ओंकारनगर वाचनालयाचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायणराव काकड यांनी मनोगत व्यक्त केले.शंकरराव पिंगळे यांनी महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या, असे आवाहन केले. तसेच प्रभागात अभ्यासिका होणे गरजेचे असून, या गावची संस्कृती वेगळी आहे, ती जपण्याचा प्रयत्न करा, असे सांगितले. नारायणराव काकड यांनी प्रभाग मोठा असून, पाटाच्या खाली एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांनी क्रांतीनगर भागात एक संपर्क कार्यालय उघडा. तेथील विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, अशी सूचना केली. यावेळी ग्रामविकास मंडळ, विविध कार्यकारी सोसायटी, क्रांतिवीर वसंतराव नाईक समाज विकास मंडळ, ओंकारनगर वाचनालय, मराठा समाज आदी संस्थांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी उत्तर देताना आम्ही सर्व जण विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय फडोळ यांनी केले. कार्यक्रमास माजी नगरसेवक दामोदर मानकर, जगन्नाथ तांदळे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायणराव काकड, मखमलाबाद सोसायटीचे माजी सभापती मदनशेठ पिंगळे, देवीदास घाडगे, प्रभाकर पिंगळे, गणपतराव काकड, संजय गामणे, मिलिंद मानकर, अनिल काकड, रामदास काकड, आर्किटेक्ट पंडितराव काकड, कैलास दराडे, अजि ताडगे, निवृत्ती काकड, देवराम पालवे, वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, निवृत्ती महाले, ज्येेष्ठ ग्रामस्थ पंढरीनाथ काकड, शंकरराव पिंगळे, भास्कर दराडे, प्रा. बाळासाहेब पिंगळे, देवीदास घाडगे, प्रभाकर पिंगळे, सोमनाथ पिंगळे, बापूशेठ पिंगळे, सुभाष काकड, उत्तम काकड, सुरेश तांदळे, मोतीराम पिंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

We will provide maximum funds for the ward: Sunil Kedar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *