श्री शिव महापुराण कथेला उत्साहात सुरुवात;
लाखोंच्या संख्येने भाविकांची हजेरी
सत्कर्माने कमावलेले धन जीवनाचे कल्याण करते… आणि पुन्हा पुन्हा अर्थ प्राप्ती होते. पण तेच धन जर कष्टाचे नसेल ,अनैतिक मार्गाने मिळवलेले असेल तर जीवनाचा नाश करते. कष्टाने कमावलेले धन ही अकर्माच्या एका धनाबरोबर जीवनात विविध प्रकारचे संकट येऊन लोप पावते..व्यक्ती व्यसनाधीन होऊन सर्व धनाचा नाश करते असे उदबोधन पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी मालेगाव येथे कॉलेज मैदानावर आयोजित श्री शिवमहापुराण कथा महोत्सवाच्या प्रारंभ प्रसंगी केले.
त्यांनी प्रवचनातून सांगितले, प्रत्येकानी देवाची श्रद्धा करताना दिखावा करायला नको..देवाचे पुजा पाठ करत दिखावा केल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. त्यासाठी शुद्ध मन आणि आचरण हव..कधीही कोणाच्याही बाबतीत वाईट विचार न करता सत्कर्म केले तर नक्कीच देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्यांनी विविध
उदाहरणे देत भाविकांना मार्गदर्शन केले.
मालेगाव शहरातील कॉलेज मैदानावर श्री शिवमहापुराण कथा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मालेगाव शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कथेच्या पूर्वसंध्येलाच भाविक कथेच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. मंडपाच्या बाहेर पर्यंत चहूबाजूंनी भाविकांची गर्दी झाली होती. महाराष्ट्र राज्यासह सह इतर राज्यातील हजारो भाविक शिव कथा पूर्व संध्येस मालेगावात दाखल झाले आहेत.
कथेच्या सुरुवातीस महाआरती करून प्रारंभ झाला.
आयोजकांनी अचूक नियोजन केले असुन पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. कथेच्या वेळेत मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे शिव कथेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मालेगाव नगरी शिवमय झाली आहे. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.श्री शिव महापुराण कथा महोत्सवासाठी गुरूवारी सायंकाळी पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे मालेगाव शहरात आगमन झाल्यानंतर मोठया संख्येने भाविकांनी हजेरी लावत मोसम पुलावर हजारो गर्दी केली होती. पंडित मिश्रा यांचे अभूततपूर्व जल्लोषात स्वागत केले. मोठया संख्येने महीला, पुरुष अबाल वृध्द कथा श्रवणासाठी दाखल झाले आहेत. मोठया संख्येने भाविक मुक्कामी असून जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.