” मनातलं “या सदरा अंतर्गत –
” वीक पॉईंट –
“अहो, आता बरा पुळका आलाय भावजींना, सासूबाईंना त्यांच्या घरी न्यायचा. काहीतरी प्रॉब्लेम आला असेल… दुसरं काय ”
…………
” जाऊ दे ना, आपण कशाला खोलात जायचं. नेतो म्हणतोय तर नेऊ दे ”
………..
“माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी तर आजन्म सांभाळायला तयार आहे त्यांना… त्यांची अशी 6 महिने इकडे आणि 6 महिने तिकडे उचल बांगडी मलाच आवडत नाही .. पण हे आहेत ना तुमचे लहान बंधुराज, लाडके,… त्यांच्या मनांत येतं तेंव्हा नेतात… काम झालं की आणून सोडतात…”
…………….
” हो बरोबर आहे तुझं म्हणणे..पण मला काही त्याचे मन मोडवत नाही . सामान पॅक करून ठेव आईचे.या वीकएंड ला सकाळी गाडी पाठवतो म्हणालाय तो ”
………..
“बांधून ठेवलंय कालच ”
………………………
………………………
“ए आई, काय ग हे, काका पुन्हा नेतोय आज्जीला त्याच्या घरी….”
………..
” अग, नेऊ दे ना…. आज्जीलाही बदल आणि काकाचीही मदत…. काही अडचण असेल तर…. ”
………
” बरं ठीक आहे……येईलच की थोडे दिवसांनीं…. ए आई, तुला
माहित आहे कां?ती पल्लू सांगत होती..”
……..
” कोणती पल्लू?”
…..
” अग, मला काय 5/10 मैत्रिणी आहेत कां पल्लू नावाच्या…. आई…….
तुझं लक्ष नाहीये मी काय सांगतीये त्याच्याकडे ”
……..
“हो ग बाई .. नाहीये माझं लक्ष.. मी विचार करतीये कोणती अडचण आली असेल सरोजला.. मागच्या वेळेला भावाच्या लग्नाला गेली चांगलीच रमली तिकडे.. महिना दोन महिने राहिली..नवऱ्याची, मुलाची काळजी नाही ना काही….”
……..
“हो अग, मलाही आठवतं ना..काकूच्या आईचे ऑपेरेशन होते तर आपली आजी च गेली होती “.
……..
“अग, आपली नको म्हणू .आर्यन ची पण आजी आहे ती ”
………
“हो ना, मग तसं वागवा ना आजीला. तिकडून आली की आजी अगदी थकून गेलेली असती.. आपल्या घरी बघ… कशी तुकतुकीत असती ती ”
…….
“असं नाही वेडाबाई ”
……..
“नाही कसं… अग, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. मी सांगत होते. पल्लूच्या आईसोबत
काकू दवाखान्यात गेली होती. न्यूज आहे बहुधा ”
……
“हं… तरी म्हणलं.. कशाला नेत आहेत आईला… आर्यन आता झाला की 6/7वर्षाचा…”
…….
“तरीच…”
…….
“पण तू पडू नकोस हं याच्या मध्ये. लहानांच काही काम नाही ”
………
“मी कशाला बोलू पण आई बाबांना समजत नाही कां ग. काका कसा वागतो ते… ”
……..
“समजत नाही असं कसं होईल… सगळं समजतं त्यांना… पण भावजींच्या बाबतीत ते फार हळवे आहेत ग… त्यांच्या चुका बाबत बोललं की भारी वाईट वाटतं त्यांना.100 अपराध माफ आहेत त्यांचे. आणि मी काय म्हणते… असतो एकेकाचा वीक पॉईंट… आपण कशाला त्यावर बोट ठेवायचं. एरवी वाघासारखे असणारे तुझे बाबा, भावजींबाबत शेळी होऊन जातात.”
………
“आणि याचा फायदा काका घेतो…. त्याचं काय ”
…….
“जाऊ दे तायडे…. आपण आपल्या माणसाचं मन सांभाळायचं… जपायचं.. इतकं मला माहित आहे.”
……..
“म्हणजे तू बाबांना आत्ता चं आजीला त्या घरी न्यायचं कारण सांगणार नाहीस… असंच दिसतंय मला ”
…….
“नाहीच सांगणार… नाहीतरी लपून थोडंच राहणारे ते… समजेलच की चार पाच महिन्यात… आपणहून सांगून त्यांना कशाला दुखवायचं… तेवढं एक सोडलं की लाख माणूस आहेत ग तुझे बाबा ”
…………
“वो तो हैं… अरे, आपुन के बापू के जैसा बापू नही किसके पास… अपना बापू बोलें तो अपना बापू…..”
………..
“मग, झालंच तर…. त्यांनी वडिलांच्या माघारी.. वडिलांसारखे वाढवलेय ग भावजींना.. म्हणून मी एक शब्द,….शब्द काय…. एक अक्षर
ही बोलून त्यांचे मन दुखावणार
नाही.. ही काळ्या दगडावरची रेघ ”
………….
“इतना हसबँड कां खयाल रखना.. आपुन से नही होगा बॉस….
…………….
” तुस्सी ग्रेट हो मम्मीजी…… तुस्सी ग्रेट हो “…..
©विशाखा बल्लाळ