नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या पावसाच्या जोरदार बॅटिगमुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले असून काल रविवार असतानाही शहरातील बाजारपेठेत शांतता असल्याचे चित्र होते. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात रविवार असल्याने शहर परिसरात शांतत जाणवत होती.
विकेंडला अनेकाकडून आऊटिंगचे प्लॅन करण्यात येतात. मात्र, मात्र शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी,नाले ,ओढ्यांना पुर आल्याचे चित्र आहे.जिल्हयाच्या अनेक भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पावसाळी पर्यंटनाला जाणार्यांची संख्या रोडावली आहे. तर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र पावसामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्याचे पाहवयास मिळाले. त्याच प्रमाणे विकेंडला मुव्हि आणि हॉटेलिंकला जाणार्यांची संख्या मात्र अधिक असल्याचे चित्र होते.
नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसावर आला असल्याने घरोघरी तयारी करण्यात येते. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक कामांना ब्रेक लागला आहे. पावसात बाहेर फिजल्यापेक्षा रविवारचा दिवस कुटूंबासोबत घरच्या घरीच एन्जॉय करणे नाशिकरांनी पसंत केले आहे.
व्यावसायिकांना फटका
मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. मेन रोड, दहिपूल , शालिमार या ठिकाणी रस्त्यालगत व्यवसाय करणार्या य्यावसायिकांना सतत सुरू असणार्या पावसामुळे व्यवसाय बंद ं ठेवावा लागत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर खरेदीसाठी मोठी गर्दी होत असताना पावसामुळे व्यवसाय बंद ठेवावा लागत अससल्याने मोठे नुकसान व्यवसायिकांना सहन करावे लागत आहे. तर पावसामुळे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले साहित्य भिजत असल्याने व्यावसायिक मेटाकूटीला आले आहेत.
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…
बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार नाशिक :प्रतिनिधी…
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…
संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा " मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती…