दि. 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2025

पुरुषोत्तम नाईक

मेष : लाभ होतील
या सप्ताहात मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या समस्या उग्र रूप धारण करतील. व्यापारी, व्यावसायिकांनी मितभाषीपणाने व्यवहार केल्यास लाभ होतील. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्या.
वृषभ : खर्च वाढतील
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. नोकरदारांच्या कामाचा वेग मंदावेल. व्यापारी, व्यावसायिकांना मंगलवार्ता कळतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी येतील. मानसिक अस्वस्थ जाणवेल. वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : व्यवसायवृध्दी होईल
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात धनचिंता सतावतील. खर्च वाढतील. सावकार, बँका तगादे लावतील. नोकरदारांना संघर्षाला तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृद्धी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी येतील.
सिंह : आगेकूच होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. धनचिंता सतावतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामातील अडचणी दूर होतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची आगेकूच होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : अचानक धनलाभ
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांची कामे बिघडतील. व्यापारी, व्यावसायिकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधक त्रस्त करतील. प्रकृती सांभाळा.
तुळ : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती अनुकूल राहील. पैशांची आवक वाढेल. खर्चही वाढतील. शेअरमध्ये लाभ होतील. मनावर संयम ठेवा. वादविवाद टाळा. कुटुंबीयांनी गोड वागा. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : निर्णय चुकतील
या सप्ताहात रवी, शनि, शुक्र अनुकूल आहेत. मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. प्रवासात अडचणी येतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
धनु : विवाह जुळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि, रवी, प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. अविवाहितांचे विवाह जुळतील. अनुरूप वधूवर मिळतील. नोकरदारांना अडचणी जाणवतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. आरोग्य् चांगले राहील.
मकर : संयम पाळा
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी संघर्ष टाळावा. व्यापारी, व्यावसायिकांनी मनावर संयम पाळावा. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्यावी. विरोधक अडचणी निर्माण करतील.
कुंभ : प्रगती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू प्र्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची प्रगती होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्यप्रश्न सतावतील.
मीन : प्रवास टाळा
या सप्ताहात गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. विरोधक अडचणी निर्माण करतील. नोकरदार व व्यपारी, व्यावसायिकांची समीकरणे चुकतील. प्रवास अडचणीचे ठरतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा.

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago