दि. 12 ते 18 ऑक्टोबर 2025
पुरुषोत्तम नाईक
मेष : धनचिंता मिटतील
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंता मिटतील. खर्च वाढतील. मानसिक ताणतणाव निर्माण होतील. नोकरदारांनी कामचुकारपणा करणे अंगाशी येईल. व्यापारी, व्यावसायिकांनी संयमाने परिस्थिती हाताळणे योग्य ठरेल. आरोग्याकडे नीट लक्ष देणे आवश्यक.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे यशस्वी होतील. विरोधकांच्या कारवायांना ऊत येईल. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची द्विधा मनःस्थिती होईल. व्यापारी, व्यावसायिकांना आनंदवार्ता कळतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी येतील. मानसिक अस्वस्थता त्रस्त करेल. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
कर्क : संघर्ष टाळा
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांनी वरिष्ठांशी संघर्ष टाळावा. संयम पाळणे हितकारक ठरेल. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकृती सांभाळा.
सिंह : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसयिकांच्या योजना यशस्वी होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे मनाप्रमाणे होतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. कौटुंबिक वादविवाद टाळा.
कन्या : धनलाभ होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि, शुक्र अनुकूल आहेत. शुक्र संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील. नोकरदारांचा मनस्ताप वाढविणार्या घटना घडतील. व्यापारी, व्यावसायिकांना धनलाभ होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामास विलंब होईल. आरोग्य चांगले राहील.
तूळ : अडचणी दूर होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, शनि, शुक्र, प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिक नवीन योजना आखतील. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील. मनावर संयम ठेवा. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्या.
वृश्चिक : प्रवास टाळा
या सप्ताहात शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल. आरोग्यप्रश्न त्रस्त करतील.
धनु : विवाह जमतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांना धनप्राप्ती होईल. अविवाहितांचे विवाह जमतील. अनुरूप वधू-वर मिळतील. कुपथ्य टाळा. आरोग्य जपा.
मकर : भाग्योदय होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. खर्च वाढतील. नोकरदारांनी वाद टाळावा. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल. भाग्योदयकारक घटना घडतील. आरोग्यप्रश्नांची काळजी घ्या. शेअरमध्ये लाभ होतील.
कुंभ : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांची प्र्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. खर्च वाढतील. आरोग्यप्रश्न त्रस्त करतील. मोह टाळा.
मीन : अडचणी वाढतील
या सप्ताहात शुक्र अनुकूल आहे. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी त्रस्त करतील. प्र्रवास टाळा, वाहन जपून चालवा, मनाची चलबिचल करणारा सप्ताह आहे. आरोग्याची काळजी घ्या.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…