साप्ताहिक राशिभविष्य

दि. 28 डिसेंबर ते 25 3 जानेवारी 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राही. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीचे योग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : निर्णय चुकतील
या सप्ताहात गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवासात संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : नफा वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिन आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांवर कामाचा जास्त बोजा पडेल. व्यापारी, व्यावसायिकांनी संयमाने परिस्थिती हाताळल्यास नफ्याचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : धनचिंतांना उतार
या सप्ताहात बुध, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. नोकरदारांना विरोधक त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिक अडचणींवर मात करतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी उद्भवतील. प्रकृतीप्रश्न सतावतील.
सिंह : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. आर्थिक विवंचना सतावतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना व व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. आरोग्यप्रश्न सतावतील. प्रकृतीची काळजी घ्या.
कन्या : धाडस टाळा
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांनी धाडस टाळावे. नोकरदारांनी वरिष्ठांशी संघर्ष टाळावा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकुल आहे चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. नोकरदारांना कामाचा ताण वाढेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्चिक : अचानक धनलाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक समिकरणे जुळतील. अचानक धनलाभाचे योग यावेत. प्रकृती जपा.
धनु : बढती मिळेल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांचे अडाखे अचूक ठरतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. आरोग्य जपा.
मकर : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात शनि अनुकूल आहे. रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. प्रकृती सांभाळा.
कुंभ : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. सांपतिक अडचणी दूर होतील. शेअरमध्ये लाभ होतील. मानसिक अस्वस्थ्य जाणवेल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना आनंदवार्ता कळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल.
मीन : संघर्ष टाळा
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंदभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगल राहील. पैशांचे नवे स्त्रोत सुरू होतील. खर्च वाढतील. शेअरमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरदारांनी वादविवाद, संघर्ष टाळून काम करावे. व्यापारी, व्यावसायिकांची कामे पूर्ण होतील. प्रकृती चांगली राहील.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *