दि. 4 ते 10 जानेवारी 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी संभवतात. व्यापारी, व्यावसायिकांना भाग्योदयकारक घटना घडतील. शेअरमध्ये लाभ होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामास विलंब होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरेल.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांनी आपली कामे सावधपणे करावी. अडचणींना तोंड देण्याची वेळ येईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. प्रवास टाळावा, वाहन जपून चालवावे. आरोग्य जपा.
मिथुन : प्रगती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमरे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांची कामासाठी धावपळ होईल. प्रवास लाभदायी ठरतील. व्यापारी, व्यावसायिकांची प्रगती होईल. मनावर संयम ठेवा. प्रकृती चांगली राहील.
कर्क : आर्थिक परिस्थिती चांगली
या सप्ताहात बुध, शनि अनुकूल आहे. रवी, मंगळ, शुक्र, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांना विरोधकांच्या कारवायांचा त्रास होईल. व्यापारी, व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. अकरावा गुरू दिलासा देईल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. शेअरमध्ये लाभ होतील.
कन्या : प्रवास टाळा
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत.चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी वाद टाळावे. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे लांबणीवर पडतील. वाहन जपून चालवा. प्रवास टाळा.
तूळ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय कामात यश मिळेल.
वृश्चिक : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांचे मानसिक अस्वस्थ राहील. व्यापारी, व्यावसायिकांना धनलाभ होतील. प्रकृती सांभाळा.
धनु : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या इच्छा पूर्ण होतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या नवीन योजना कार्यान्वित होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे पूर्ण होतील.
मकर : काळजी घ्या
या सप्ताहात शनि अनुकूल आहे. रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. विरोधकांच्या कारवायांकडे नीट लक्ष ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. धनचिंता सतावतील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्याचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वास्थ वाढेल. कौटुंबिक वाद सामंजस्याने मिटवा. प्रकृतीचे पथ्य पाळा.
मीन : आर्थिक परिस्थिती संमिश्र
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या समस्या बिकट बनतील. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकावे. मानसिक अस्वस्थ त्रस्त करेल. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे लांबणीवर पडतील.
Weekly Horoscope