दि. 8 ते 14 फेब्रुवारी 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : आर्थिक सुधारणा
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी 12 फेबु्रवारीपासून शुभ आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती सुधारेल. खर्च वाढतील. नोकरदारांनी वाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक गणिते जुळतील. शेअरमध्ये लाभ होतील.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना यशप्राप्ती होईल. मंगलवार्ता कळतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : उत्साह वाढेल
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना कामात उत्साह वाढेल. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा,
कर्क : सन्मानप्राप्ती
या सप्ताहात मंगळ, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, शुक्र, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. धनचिंतांना उतार पडेल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना सन्मानप्राप्ती होईल. शेअरमध्ये केलेली गुंतवणूक अडचणीत येईल.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. 12 फेब्रुवारीनंतर रवीची प्रतिकूलता वाढेल. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृद्धी लाभेल. आरोग्य चांगले राहील.
कन्या : आर्थिक समृद्धी
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. 12 फेब्रुवारीनंतर रवीची प्रतिकूलता वाढेल. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृद्धी लाभेल. आरोग्य चांगले राहील.
तूळ : भाग्योदय होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. 13 फेबु्रवारीनंतर रवी अनुकूल होईल. आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका.
धनु : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभमणे अनुकूल आहेत. 12 फेब्रवारीनंतर रवी प्रतिकूल होईल. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. स्थावराचे प्रश्न सुटतील. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.
मकर : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. धनचिंता दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : वाहन जपून चालवा
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांविषयी वरिष्ठांचे गैरसमज होतील. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळतील. राहत्या घराचे प्रश्न निर्माण होतील.
मीन : अडचणी सौम्य होतील
या सप्ताहात रवी, मंगळ अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते चुकतील. मानसिक अस्वास्थ जाणवेल.
Weekly Horoscope
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…