दि. 15 ते 21 फेब्रुवारी 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : धनचिंता मिटतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना सन्मानप्राप्तीचे योग येतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या धनचिंता मिटतील. प्रकृतीप्र्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ : यशप्र्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक राहील. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे करारमदार स्वत: हाताळावेत. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.
मिथुन : भाग्योदय होईल
या सप्ताहात शनि, रवी, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ प्रतिकुल आहे . चंद्रभमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांची कामाची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. प्रकृती सांभाळा.
कर्क : धाडस यशस्वी होईल
या सप्ताहात मंगळ, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट कचेरीची कामे मनाप्रमाणे होणार नाहीत. नोकरदारांचे धाडस यशस्वी होईल. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक समिकरणे चुकतील. आरोग्यप्रश्न त्रस्त करतील.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकुल आहे. रवी, मंगळ, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. खर्च वाढतील. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. आर्थिक दिलासा मिळेल. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची प्रगती होईल. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्यावी लागेल.
कन्या : दडपण येईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांवर कामाचे दडपण येईल. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे करार लांबणीवर टाकणे इष्ट ठरेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात विलंब होईल. आरोग्य चांगले राहील.
तूळ: सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील.
वृश्चिक : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. प्रकृती प्रश्नांची काळजी घ्या.
धनु : विवाह जमतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, गुरू,ू राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे वसूल होतील. खर्च आटोक्यात राहतील. विवाहेच्छूंचे विवाह जमतील. मनाप्रमाणे वधू-वर मिळतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. प्रकृती सांभाळा.
मकर : आर्थिक लाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंता दूर होतील. नोकरदारांना व व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. कुपथ्य टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : सामंजस्य दाखवा
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. मानसिक अस्वस्थ्य प्राप्त होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. कौटुंबिक वादविवाद सामंजस्याने सोडवा.
मीन : प्रश्न सुटतील
या सप्ताहात मंगळ अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. स्थावराचे प्रश्न सुटतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या.
Weekly Horoscope