दि. 8 ते 14 मार्च 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : सांपत्तिक लाभ
या सप्ताहात रवी, बुध, मंगळ, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनिची साडेसाती, शुक्र प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना सांपत्तिक लाभ होईल. शासकीय,कोर्ट, कचेरीच्या कामांना विलंब होईल. नवीन स्थावर, वाहन घेर्याच्या योजना आखल्या जातील. प्रकृती चांगली राहील.
वृषभ : भरभराट होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बध, राहू, गुरू, शनि, रवी, शुक्र अनुकूल आहेत. राहू, केतू, प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची भरभराट होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : व्यवसायवृध्दी होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. मानसिक अस्वास्थ जाणवेल. नोकरदार व कामाच्या बोजाने त्रस्त होतील. व्यापारी व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शासकीय, कोर्ट कचेरीची कामे लांबणीवर पडतील. आरोग्य जपा.
कर्क : प्रवास टाळा
या सप्ताहात शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांनी प्रवास टाळावा, वाहन जपून चालवावे. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात सावध भूमिका ठेवणे महत्त्वाचे. आरोग्य प्रश्नांकडे नीट लक्ष पुरवावे.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, अनुकूल आहेत. शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. मात्र गरजेच्या वेळेस आर्थिक दिलासा मिळेल. खर्च वाढतील. नोकरदारांच्या कामातील चुकांमुळे वरिष्ठ नाराज होतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामाबाबतद काळजी घ्या. प्रकृती जपा.
कन्या : विरोधकांवर लक्ष ठेवा
या सप्ताहात बुध, शनि, शुक्र अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. पैसे हाताशी येतील. धनचिंतांना विराम मिळेल. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या परिस्थितीत बदल होईल. आरोग्य जपा. विरोधकांवर लक्ष ठेवा.
तूळ : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, राहू, केतू, गुरू अनुकूल आहेत. शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. भाग्योदयकारक घटना घडतील. शेअरमध्ये सावध भूमिका उपयुक्त ठरेल. नोकरदारांच्या समस्या दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. कुपथ्य टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : धनचिंतांना उतार
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंता कमी होतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येतील. नोकरदारांचे वरिष्ठां खटके उडतील. व्यापारी, व्यावसायिकांनी जपून निर्णय घ्यावे, आरोग्याची काळजी घ्या.
धनु : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंतांना सामोरे जावे लागेल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता निर्माण होईल. प्रकृती सांभाळा.
मकर : नफा वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची हवी तेथे मनाप्रमाणे बदली होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या नफ्याचे प्रमाण वाढेल. विरोधकांच्या कारवाया उलटून पडतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : कटुता टाळा
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. वादविवाद टाळा. मनावर संयम ठेवा. संबंधात कटुता टाळा. मन अस्वस्थ होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आर्थिक विवंचनांना तोंड द्यावे लागेल.
मीन : पैसे मिळतील
या सप्ताहात शुक्र अनुकूल आहे. रवी, मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात सांपत्तिक अडचणी दूर होतील. पैशांचे स्त्रोत सुरू होतील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील, आरोग्य जपा.
Weekly Horoscope
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…