दि. 22 ते 28 जून 2025
पुरुषोत्तम नाईक
मेष : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, बुध अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, शनि, राहू, मंगळ, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शेअरमध्ये गुंतवणुकीचे धाडस टाळा. प्रवास टाळा, वाहन सावधगिरीने चालवा. प्रकृती जपा.
वृषभ : पगारवाढ होईल
या सप्ताहात गुरू शुक्र, शनि, राहू, केतू अनुकल आहेत. रवी, मंगळ, बुध प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळणार नाहीत. कुठलेही धाडस करणे टाळा, शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकृतीविषयी सतर्क रहाणे योग्य वेळ ठरेल.
मिथुन : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती अडचणींची राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. बांधकाम व्यावसायिकांनी करारमदार करताना सावध रहाणे आवश्यक ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क : आर्थिक दिलासा
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ गुरू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र असली तरी दिलासा मिळेल. अचानक पैशांची आवक वाढेल. शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे मार्ग सुकर होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामास विलंब होईल. आरोग्य चांगले राहील.
सिंह : भाग्योदय होईल
या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैशांसाठी धावपळ करावी लागेल. अडचणीतून मार्ग सापडतील. नोकरदारांच्या चुका अंगावर येतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शेअरमध्ये गुंतवणूक टाळा. मोठी जोखीम उचलू नका. पासून सिंह राशीस अकरावा होणारा गुरू सर्व क्षेत्रात यश, उत्साह होईल. अनेकांची काळजी घ्या.
कन्या : निर्णय चुकतील
या सप्ताहात रवी, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना कामाचा ताण वाढेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : नवीन प्रेरणा मिळेल
या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. पासून भाग्यस्थानात येणारा गुरू भाग्योदय घडविणारा ठरेल. नवीन प्रेरणा देईल. रवी, मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी संयम ठेवावा. वाद टाळावे. अकारण संघर्ष अंगावर येईल. विरोधक कारवाया करतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक : आरोग्य सांभाळा
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, गुरू, मंगळ प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना कष्ट सोसावे लागतील. व्यापारी, व्यावसायिकांचा व्यवसाय प्रयत्नपूर्वक वाढवावा लागेल. आरोग्यप्रश्न सतावतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील.
धनु : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात गुरू, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. दि. 14 मेपासून सप्ताहात येणारा गुरू मनाला उभारी देईल. नवनवीन कल्पना सुचतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. नोकरदारांना संकटे सतावतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा, आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर : सन्मानप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या नवीन योजना लाभदायक ठरतील. वारसा हक्कांचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : व्यवसायवृध्दी
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांविरुध्द हितशत्रू षडयंत्र रचतील. अत्यंत सावध राहून विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष पुरविणे गरजेचे ठरेल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. मूलत्रिकोणी येणारा गुरू संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य देईल. आरोग्यप्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
मीन : धनप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे वसूल होतील . खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता राहील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना धनप्राप्ती होईल. वाहन जपून चालवा. शक्यतो प्रवास टाळा. शासकीय, कोर्ट कचेरीची कामे अडचणीत येतील.