दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025
पुरुषोत्तम नाईक

मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनिची साडेसाती, रवी, मंगळ प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांचे प्रयत्न यशस्वी होतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. विरोधकांच्या कारवायांमुळे दुर्लक्ष करू नका. आरोग्य जपा.
वृषभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना सतर्क राहणे गरजेचे आहे. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शेअरमध्ये लाभ होतील. कोर्ट, कचेरीच्या शासकीय कामात अनुकूल निर्णय होतील. प्रकृती चांगली राहील.
मिथुन : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरु संमिश्र आहे. मंगळ प्रतिकुल आहे. राहत्या घराचे प्रश्न निर्माण होतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनाची ओढाताण होईल. नोकरदारांचा वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : अडचणी येतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. नोकरदारांची कामे तडफेने पूर्ण होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. प्रकृती जपा.
सिंह : बढती मिळेल
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, बुध, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. आर्थिक दिलासा मिळेल. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही करारमदारावर सह्या करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : धावपळ होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक संतुलन सांभाळा, वाद, संघर्ष टाळा, नोकरदांची कामासाठी धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांना नफ्याचे प्रमाण वाढेल.
तूळ : प्रवास टाळा
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, जोखीम स्वीकारू नका. वाहन जपून चालवा. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकावेत.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शेअरमध्ये कुठलीही जोखीम स्वीकारणे अडचणीचे ठरेल. प्रकृती सांभाळा.
धनु : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक दिलासा मिळेल. खर्च आटोक्यात राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांवर वरिष्ठ नाराज होतील. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. आरोग्य जपा.
मकर : समिकरणे जुळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामावर विलंब होईल. प्रकृती सांभाळा.
कुंभ : खर्च वाढतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना संकटांना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. आरोग्य जपा.
मीन : आर्थिक परिस्थिती संमिश्र
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, मंगळ, गुरू, राहू, केतू प्र्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. कौटुंबिक वादविवाद सामंजस्याने सोडवा. आरोग्याची काळजी घ्या.

Gavkari Admin

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

4 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

9 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

9 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

9 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

10 hours ago

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…

10 hours ago