नाशिक : प्रतिनिधी
नवीन वर्षाचे जल्लोषपूर्ण वातावरणात फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने निर्बंधमुक्त थर्टी फर्स्ट साजरा झाल्याने तरूणाईचा द्विगुणित झाला होता. नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच उत्साहाचे वातावरण होते.. त्यामुळे हाॅटेल्स ,रेस्टॉरंट,चित्रपटगृहे , मंदिरे अशा सर्व ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. आपापल्या घरी कुटुंबिय,मित्र मैत्रिणी आणि आप्त स्वकीयांसोबत जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. तर अनेकांनी हाॅटेल्सच्या पार्सल सेवेचा लाभ घेत थर्टी फर्स्टचे सेलेब्रेशन केले. तर केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करण्याकडे तरूणाईचा कल असल्याने केक शॉपवर गर्दी झाली होती.
नाशिक पर्यटनस्थळ असल्याने शहरात राज्यातील विविध भागातून पर्यटक दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तसेच थर्टी फर्स्टला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेत उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
नव वर्षाचे सोशल मिडीयावर रंग
सध्याच्या काळात सोशल मिडियावर सण ,उत्सवाचे जोरदार स्वागत करण्यात येते. नवीन वर्ष सुरू व्हायला दोन दिवस बाकी असताना सोशल मिडियात नवीन वर्ष स्वागताचे रंग दिसत होते.त्यात थर्टी फर्स्टच्या रात्री तर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सरत्या वर्षाचा मागोवा घेत नवीन वर्षाचा संकल्प करत सोशल मिडियात नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. रात्री बारा नंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा जणू पाऊस सोशल मिडियात झाला
हाॅटेल व्यावसायिकांना अच्छे दिन
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टला नाईट आऊट , पार्टीज आयोजित केल्या होत्या. त्यामुळे हाॅटेल्स,रेस्टॉरंटवर गर्दी झाली होती. परिणामी थर्टी फर्स्टसाठी हॉटेल व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून नुकसान सहन करावे लागले होते.
फटाक्यांची आतषबाजी
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी विविध प्रकारचे प्लॅन केले होते. त्यात काहीनी रात्री बारा वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…