पंचवटी : सुनील बुनगे
नाशिक महानगरपालिका निवडणूक अद्यापही उमेदवारी जाहीर न झाल्याने इच्छुकांसह विद्यमानदेखील हतबल झाले आहेत. त्यातच आयारामांसाठी रेड कार्पेट टाकण्यात येत असल्याने निष्ठावंत संकटात सापडले आहेत. त्यातच नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस राहिल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला असल्याने भाजपामध्ये शत-प्रतिशत गोंधळाचे वातावरण आहे.
यंदाची नाशिक मनपा निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाने 100 प्लसचा नारा दिल्याने भाजप मात्र ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यातच सर्वच प्रभागांमध्ये भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्यादेखील मोठी असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. गेले अनेक वर्षे नगरसेवकपदाचे स्वप्न बघणारे निष्ठावंत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यामुळे यंदा जर निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यास मात्र त्यांचे नगरसेवक पदाचे स्वप्न पूर्णपणे भंगून जाणार आहे. भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजनांनी जरी निष्ठावंतांवर अन्याय होणार नसल्याचे म्हटले तरी त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. चार सदस्यीय प्रभागरचनेत दोन एकत्र येऊन प्रचार करताना दिसून आले. मात्र, ऐनवेळी पक्षाने दुसर्याच उमेदवाराला तिकीट दिले तर काय करायचे, हा प्रश्न पडू लागल्याने वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. पंचवटीत 2017 ला झालेल्या निवडणुकीत 24 पैकी भाजपला 19 जागा मिळाल्या होत्या. मनसेला दोन, अपक्ष दोन आणि शिवसेना एक अशी स्थिती होती. आता मनसेचे दोन्ही माजी नगरसेवक आणि दोन्ही अपक्ष नगरसेवक यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिवसेनेचा एकमेव नगरसेवक शिंदे गटात गेला आहे. पक्षांतरामुळे भाजपच्या अनेक इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
उपर्यांना संधी मिळाल्यास निष्ठावंत करणार गेम!
पंचवटी परिसरातील अनेक प्रभागांत उपर्यांची संख्या वाढल्याने पक्षासाठी जोडे झिजवलेल्या निष्ठावंतांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बाहेरून आयात झालेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळत असल्याच्या चर्चांमुळे प्रभागातील स्थानिक उमेदवार एकवटताना दिसून येऊ लागले आहेत. तर भाजपमधील मेगा भरतीमुळे निष्ठावंत वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ऐकायला मिळू लागली आहे. प्रभाग क्रमांक एक आणि सहामध्ये अशाच प्रकारची चर्चा आहे. बाहेरून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात प्रभाग क्रमांक सहामध्ये एक स्वतंत्र पॅनल निर्मिती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांची मुलगी जयश्री नीलेश चौधरी (खोसकर) यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्याने भारतीय जनता पक्षाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे, हे मात्र नक्की.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…