ञ्यंबकेश्वर
नववर्षाचे स्वागत करताना त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तिर्थावर गंगा गोदावरीची महाआरती करण्यात आली.यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेशतात्या गंगापुत्र यांचे वाढदिवसा निमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न करण्यात आला.सिंहस्थ कुंभमेळयाचे ठिकाण असलेला कुशावर्त तीर्थ घाट व्यवस्थापनाचा मान गंगापुत्र परिवाराच्या ट्रस्टकडे आहे. नववर्षानिमित्त श्री गोदावरी मातेच्या महाआरतीचे व गंगापुत्र परिवारातील जेष्ठ सदस्य लोकनेते सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या अभिष्टचिंतन
सोहळ्याचे आयोजन गंगापुत्र ट्रस्ट व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.यानिमित्त कुशावर्त तिर्थावर विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती.तसेच तिर्थाच्या चारही बाजुंनी पणत्या लावण्यात आल्या होत्या.या महाआरतीस आखाडा परिषदेचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत गणेशानंद सरस्वती महाराज, महंत गोपालदास महाराज, विविध आखाड्याचे साधुमहंत, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुरेशतात्या गगापुत्र, नगरसेवक तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कळमकर, त्र्यंबकेश्वराचे प्रदोषपुष्प पुजक उल्हास आराधी, नगरसेविका तथा गटनेत्या मंगला आराधी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष शांताराम बागुल,नगरसेवक स्वप्निल शेलार, अमृता पवार आदींच्या हस्ते गोदामाईची आरती करण्यात आली.यावेळी किरण चौधरी, अक्षय नारळे, गिरीश जोशी, गंगापुत्र ट्रस्टचे अध्यक्ष एन. डी. गंगापुत्र, शंकर गंगापुत्र, सचिव राजेंद्र गंगापुत्र,विशाल गंगापुत्र, दिलीप गंगापुत्र आदींसह युवा पुरोहित वर्ग. आदींसह ग्रामस्थ. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे उगमस्थान
कुंभमेळ्यावळयाचे उगम स्थान आहे.गोदावरीच्या नित्य आरती करीता नाशिकसाठी शासनाने जसा निधी मंजुर केला तसा निधी शासनाने त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीची नित्य आरती साठी द्यावा. – सुरेशतात्या गंगापुत्र,शहर प्रमुख,बाळासाहेबांची शिवसेना.
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…