सोशल मीडियावर फोटो टाकून घेतला जातोय आनंद
नाशिक : देवयानी सोनार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झालेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी एका कार्यकर्त्याशी साधलेल्या संवादामुळे ते सोशल मीडियावर एकीकडे ट्रोल होत असतानाच, आता त्यांचे अनुकरण म्हणून सोशल मीडियावर नेटिजन आपले फोटो टाकून त्याखाली काय ती झाडी.. काय तो डोंगर… काय ते हाटील… असे कॅप्शन देत असल्याचे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता एका आमदाराने आपल्या कार्यकर्त्याला गुवाहाटीतील परिस्थिती कथन करताना तेथील वर्णन केले होते.
शहाजी पाटील गुवाहाटीचे वर्णन करताना काय ती झाडी… काय ते डोंगर… काय ते हॉटेल .. समदं ओक्के हाय, असे म्हटले आहे. ही ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर नागरिकही त्याचा आनंद घेत आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे फोटो, सेल्फी टाकून त्याखाली शहाजी पाटील यांच्या संवादाचे कॅप्शन टाकत आहेत. गेल्या चार दिवसांपासून नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. गेले चार-पाच दिवस नॉट रिचेबल असणार्या अनेक आमदारांना आपापले कार्यकर्ते फोन करीत आहेत. परंतु, अनेकदा त्यांचे फोन नॉट रिचेबल लागत असल्याने त्यांच्याशी संपर्क करून तेथील परिस्थिती जाणून घेत आहेत. नक्की कोणती भूमिका घ्यायची, कोणता झेंडा हाती घ्यायचा? याविषयी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सांगोल्याच्या या कार्यकर्त्याने आमदारांची ख्याली खुशाली विचारण्यासाठी केलेला फोन सोशल मीडियावर नवा ट्रेन्ड घेऊन आल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
पर्यटनासाठी गेलेले अनेकजण आवर्जून सेल्फी काढून तेथील आठवणी सोशल मीडियावर, व्हॉट्सऍपच्या स्टेट्सला ते ठेवत आहेत. आणि त्या फोटोखाली काय तो डोंगर, काय ते हाटिल… सगळं ओक्के हाय… असे कॅप्शन देऊन राजकीय सत्तासंघर्षात करमणूकही करून घेत आहेत.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…