अन मुख्याध्यापकाने ठोकली धूम
नेमकी काय घटना घडली?
नाशिक: प्रतिनिधी
दळणाचे खात्यावर जमा झालेल्या बिलाच्या मोबदल्यात 8 हजार आणि मार्च महिन्याचे बिल मंजूर करून देण्यासाठी 1300 असे 9300 रुपयांच्या लाचेची मागणी करून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ततानी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे लाच लुचपत चे पथक पाहून मुख्याध्यापक ने शाळेच्या दुसऱ्या गेटने धूम ठोकली, जितेंद्र खंडेराव सोनवणे ,वय 45.रा. शासकीय आश्रम शाळा ततानी असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पथकाकडून आता या मुख्याध्यापक चा शोध सुरू असून, याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेबडे, युवराज खांडवी यांनी ही कारवाई केली.