पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले

नेमके काय कारण घडले?

सिडको :  विशेष प्रतिनिधी

सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कलेक्शनच्या वर्चस्वावरून चांगलीच धुमश्चक्री उडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वादग्रस्त रजपूत आणि गोपनीय शाखेतील कर्मचारी पाटील यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर थेट हाणामारी झाली. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेतील शिस्त व कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सरकार वाडा पोलीस ठाण्यात रजपूत आणि पाटील यांच्यात वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, मात्र काही क्षणांतच हा वाद हातघाईवर गेला. दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, कपडे फाडले आणि संपूर्ण पोलीस ठाण्यात गोंधळ उडवून दिला. घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले व त्यांना वेगळे केले.

या प्रकरणात प्रभारी अधिकारी तातडीने ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित दोघांना समज दिली. मात्र, वाद इतका पेटलेला होता की, वरिष्ठांसमोरही त्यांनी एकमेकांवर आरोप करत भाष्य केले. अखेर शांतता राखण्यासाठी दोघांनाही घरी पाठवण्यात आले.

शहरात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस ठाण्यांतच अशा घटना घडणे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे. या घटनेमुळे कलेक्शनच्या वर्चस्वावरून पोलीस ठाण्यांत अंतर्गत कुरबुरी असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलीस आयुक्त कर्णिक या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरीत्या धंद्याना परवानगी देणे किंवा चालु धंदा बंद करणे यासह विविध अवैधरीत्या सुरु असलेल्या धंदेचालकांकडुन वसुली अर्थात कलेक्शन करण्यासाठी सर्वच पोलिस ठाण्यात कलेक्टर म्हणजे सुभेदार असतो आणि ही सुभेदारी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मर्जीतील पोलिस कर्मचार्‍यांकडे दिली जाते ही सुभेदारी मिळविण्यासाठी पोलिस कर्मचा-यांमध्ये मोठी चढाओढ लागते यातच पुर्वीचा सुभेदार किती कलेक्शन करतो त्यापेक्षा डबल कलेक्शन देऊ असे सुद्धा सांगितले जाते आणि हिच सुभेदारी मिळविण्यासाठी दोन कलेक्टर अर्थात सुभेदारांमध्ये वाद झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू होती

Bhagwat Udavant

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

10 hours ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

2 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

2 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

2 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

2 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

3 days ago