नाशकात चाललंय तरी काय? आता घडला हा धक्कादायक प्रकार

नाशकात चाललंय तरी काय? आता घडला हा धक्कादायक प्रकार

स्पीकरचा आवाज कमी करण्यास

सांगितल्याने दगडफेक, वाहनांची तोडफोड

सिडको विशेष प्रतिनिधी

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुटवड नगर परिसरात एका महिलेनं मुलांची परीक्षा सुरू असून स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली असता समोरच्या व्यक्तीने संतापून तिच्या घरावर दगडफेक केली. तसेच वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुटवड नगर पोलिस चौकी समोरील वेणु नगर भागात पुनित बंन्सल नावाचे गृहस्थ हे आपल्या परिवारासह पहात आहेत तर त्यांच्याच घराच्या मागिल बाजुस कुंवर नामक व्यक्ती रहात आहे सध्या बंन्सल यांच्या मुलीची परिक्षा सुरु असल्यामुळे ती अभ्यास करत होती याच दरम्यान कुंवर (वय२५) याने आपल्या घरातील स्पिकरचा मोठा आवाज करुन गाणे एैकत होता या स्पिकरच्या मोठ्या आवाजामुळे बंन्सल यांच्या मुलीला अभ्यासात व्यत्यय येत असल्याची तक्रार बंन्सल यांच्या मुलीने तीच्या आईकडे केली मुलीने केलेल्या तक्रारीची दखल घेत बंन्सल यांच्या पत्नीने कुंवर याला स्पिकरचा आवाज करू करण्यासाठी सांगितले त्याचा राग आल्याने कुंवर याने बंन्सल यांच्या घरात घुसून घरातील साहित्याची नासधूस केली तसेच घरातील लहान मुलांची सायकल रस्त्यावर फेकुन दिली तर घराबाहेर लावलेली दुचाकी गाडीसह फेकुन दिली एवढ्यावर हा कुंवर न थांबता त्याने रागाच्या भरात पुनित बंन्सल यांच्या घरावर दगडफेक केली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान याबाबत पुनित बंन्सल हे कुंवर याच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते सदर व्यक्तीच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एैन. परीक्षेच्या काळात अशा घटनांमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *