जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी

मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती म्हण मनमाड शहरातील रेल्वेला पूर्णपणे लागू होत आहे आज मनमाड शहरात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अर्थात जीएम  येत आहे याला जीएम स्पेशल असेही म्हणतात हे महाशय येत असताना रेल्वेच्या सर्वच विभागाची एकच धावपळ सुरू झाली असुन रस्ते ऑफिस टॉयलेट यासह सर्वच ठिकाणी अगदी चकचकीत करण्यात येत आहे जनरल मॅनेजर यांच्या हस्ते आज अनेक कार्यलाय गार्डन हॉस्पिटल याचे उद्घाटन लोकार्पण होणार आहे यानिमित्ताने ज्या भागांतून मॅनेजर जाणार आहेत त्या त्या भागात एकदम स्वच्छता करण्यात आली असुन गेल्या अनेक वर्षांपासून कधी नव्हे ते रेल्वे क्वार्टरला रंग मारण्यात आले आहे.रस्त्यावर स्वच्छता करण्यात आलीं आहे रेल्वे स्थानकावर देखील रंगरंगोटी करण्यात आली असुन स्वच्छता करण्यात आली आहे कँटीन यासह इतर ठिकाणी देखील स्वच्छता करण्यात आली आहे जनरल मॅनेजर यांच्या दौऱ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.मुळात केवळ डी आर एम किंवा जनरल मॅनेजर येणार असतील तेव्हा आशा सुविधा देण्यापेक्षा कायमस्वरूपी आशा सुविधा देण्यात याव्यात हे असे मत  तर सर्वसामान्य जनतेकडून  व्यक्त करण्यात येत आहे.सध्या परिस्थिती जीएम साहेब येता दारी तोच दसरा दिवाळी…! या म्हणीप्रमाणे लागू होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *