सचिन पाटील यांची फांगदर शाळेला भेट.
देवळा (प्रतिनिधी)
जिल्ह्याचा पोलीस अधिकारी म्हटला कि चोवीस तास गुन्हेगारीशी संबंध,ताण ,तणाव,त्याचा होणारा परिणाम पण आज पोलीस मुख्यालायापासून शंभर किमी अंतरावर असणाऱ्या द्विशिक्षकी शाळेला भेट देत अतिशय संवेदनशिलतेने मुलांशी गप्पा,गोष्टी केल्यात पोलीस अधिकार्यातील संवेदनशील माणूस पहात व त्यांनी शाळा भेटीतून आपलेसे केलेले विध्यार्थी पहात पालकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
कोवळ्या वयात मुलांना पोलिसांचा धाक ,पोलिसांबद्दल प्रचंड आकर्षण वाटत या मुलांसमोर उभं राहून मुलांना बालगीत,बडबडगीत,कविता ,ऱ्हाईम्स म्हणत मुलांना गोंजारत आनंदायी वातावरनात अध्यापन करत मुलाचं मन जिकून घेऊन या मुलांसोबत रममाण होतात.असा आगळा वेगळा माहोल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर (खामखेडा)ता देवळा येथील शाळेत पहायला मिळाला.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी येथील उपक्रमशील शाळेला भेट देत त्या शाळेचे उपक्रम जाणून घेत मुलांना अध्यापन केले.या वेळी पहिलीतील नवीनच दाखल झालेल्या विध्यार्थ्यांना तसेच दुसरीतील विध्यार्थ्यांना इंग्रजी अल्फाबेट,स्मार्टबोर्डच्या माध्यमातून मुळाक्षरे,बडबडगीत येरे येरे पावसा, चांदोबा चांदोबा भागलास काय,मछली जल कि राणी है हि बडबडगीत स्वतः कृती करून म्हणून दाखवली.तसेच विध्यार्थ्यांन कडून कृती करून म्हणून घेतली.
या वर्गातील विध्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी साहित्याच्या मदतीने एकक दशक,संख्या ओळख प्रत्यक्ष करून घेतली.इयत्ता तिसरी चौथीच्या वर्गात विध्यार्थ्यांना गुणाकार तसेच भागाकाराची गणिते स्वतः सोडवून दाखवलीत.तिसरी चौथीच्या पाठ्यपुस्तकातील कविता,ऱ्हाईम्स विध्यार्थ्यांकडून म्हणून घेतल्यात.
कोरोना काळात मुल अधिक मोबाईलशी जोडली गेली.याचे दुष्परिणाम व लहान मुलांनी घ्यावयाची काळजी याबद्दल देखील विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या कडून विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी देवळा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे,गटशिक्षण अधिकारी सतिश बच्छाव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र शेवाळे,दीपक मोरे,धनराज शेवाळे,प्रकाश शेवाळे,साहेबराव मोरे,हेमंत मोरे,नंदू बच्छाव,भूषण आहेर,विजय मोरे,बबन सूर्यवंशी,अमित मोरे,दत्तात्रय बच्छाव, दीपक सूर्यवंशी ,देविदास मोरे,सोपान सोनवणे,वैभव पवार उपस्थित होते.मुख्याध्यापक संजय गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले,तर खंडू मोरे यांनी आभार मानलेत.
ग्रामीण भागातील अतिशय दुर्गम भागात द्विशिक्षकी शाळेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकसहभागातून साधलेला विकास व शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विध्यार्थ्यांचा साधलेला गुणवत्ता विकास या शाळेत पहायला मिळाला.खाजगी शाळांना देखील लाजवेल असा बदल फांगदर शाळेच्या शिक्षकांनी घडवून आणला आहे.
सचिन पाटील पोलीस अधीक्षक