महाराष्ट्र

जेव्हा जिल्हा परिषद सीईओ स्वत:च होतात वर्‍हाडी…

नागापूरला एकल महिला व पुरुष आंतरजातीय आदर्श विवाहसोहळा

मनमाड : प्रतिनिधी
मनमाडनजीक असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात मंगळवारी (दि. 24) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत एक आगळावेगळा आणि आदर्शवत आंतरजातीय विवाहसोहळा शासकीय इतमामात पार पडला. या सोहळ्याने सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. नागापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे सीईओ ओमकार पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या योजनेंतर्गत झालेल्या या अनोख्या विवाहसोहळ्याला व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, युवासेना जिल्हाप्रमुख फरान खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती फडोळ, गटविकास अधिकारी श्रीकिसन खातळे, नागापूरचे लोकनियुक्त सरपंच पवार, उपसरपंच नीलेश पवार, ग्रामविकास अधिकारी दिलीप निकम, डॉ. संतोष जगताप तसेच विविध
खात्यांचे वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते
कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना सीईओ पवार यांनी नागापूर ग्रामपंचायतीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. ‘सरपंच पवार आणि त्यांच्या टीमने राबविलेली विकासकामे उल्लेखनीय असून, नागापूर हे एक आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पारंपरिक पद्धतीने विवाह

वर नितीन गरुड आणि वधू प्रमिला धुराडे यांचा हा विवाहसोहळा दुपारी साडेबाराला पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडला. संबळ या पारंपरिक वाद्याचा निनाद, पाहुण्यांचे फेटे बांधून केलेले स्वागत आणि लग्नानंतर झालेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे नागापूरनगरी दुमदुमून गेली होती. या सोहळ्यासाठी ग्रामस्थांची प्रचंड उपस्थिती होती. विवाहानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी व ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायत प्रांगणात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

‘सरपंच शुभमंगल’ योजनेचा लाभ

नवदाम्पत्याला शासनाच्या ‘सरपंच शुभमंगल’ योजनेंतर्गत 11,000 रुपयांचा धनादेश सीईओ ओमकार पवार आणि श्रीमती फडोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीने उचललेल्या या पावलाचे सर्वत्र कौतुक
होत आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

2 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

3 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

3 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

3 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

3 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

3 hours ago