शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिंदेसेनेत उबाठातील माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातूनच ही निवडणूक महायुतीमधील हे दोन्ही प्रमुख पक्ष स्वबळावरच लढविणार असल्याचे चित्र आहे. त्याद़ृष्टीनेच विरोधी पक्षांतील नेत्यांची मेगाभरती भाजप व शिंदेसेनेत सुरू आहे. दरम्यान, दुसरीकडे नाशिक महापालिकेसाठी शिंदेसेना व वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची चर्चा आहे. दरम्यान, यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने भाजप वगळता शिंदेसेना, ठाकरे गट, काँग्रेस या पक्षांसोबत युती होण्याचे संकेत दिले आहेत. वंचित आघाडी सोबत यावी, अशी इच्छा शिंदेसेनेची असल्याचे बोलले जाते. मात्र, वंचित कोणासोबत जाणार याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप-शिंदेसेनेत अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. भाजपला जशाच तसे उत्तर देण्यासाठी शिंदेसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे व इतर महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकीत शिंदेसेनेसोबत आल्यास त्याचा फायदाच होईल. यासाठी शिंदे गटाचे वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न असल्याची चर्चा आहे. या दोन्ही पक्षांची नाशिक महापालिकेसाठी युती झाली तर त्याचा फायदा कसा होईल, हे निकालातूनच
समजेल.
नाशिक महापालिका हद्दीत काही प्रभागांत वंचित आघाडीला मानणारा वर्ग आहे. त्यातच यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या पन्नास हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे भाजपने शंभर प्लससाठी शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांना पक्षात घेऊन त्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. अशा वेळी वंचितशी युती शिंदेसेनेला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीला शिंदेसेनेसोबतच महाविकास आघाडीतील पक्षांसोबत जाण्याचा पर्याय आहे. वंचितची स्थापना 2019 साली झाल्याने प्रथमच महापालिका निवडणुकीला पक्ष सामोरे
जात आहे.
शिंदेसेना व वंचित आघाडीची युती होणार की, वंचित दुसरा पर्याय स्वीकारणार, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे. मात्र, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे याकडे लक्ष
लागले आहे.
महापालिका निवडणुकीबाबतचे अधिकार पक्षाने स्थानिक पदाधिकार्यांना दिले आहेत. निवडणुकीच्या द़ृष्टीने शिवसेना ठाकरे गट व मनसेसमवेत प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, निवडणूक कोणासोबत लढवायची, हे श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर हेच ठरवणार असून, ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
– डॉ. अविनाश शिंदे, महानगरप्रमुख, वंचित बहुजन आघाडीशिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक महायुतीने एकत्र लढवली. त्यात महायुतीला प्रचंड यश मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आम्ही महायुती म्हणून लढविणार आहोत. मात्र, कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचे व युती करायची याबाबत मुख्य नेते श्री. शिंदे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल.
– अजय बोरस्ते, उपनेते, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…
वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…