नाशिक

मतदार कोणाच्या झोळीत टाकणार मतांचे दान?

भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी अशाच लढती

पंचवटी : सुनील बुनगे
नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत यावेळी भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाल्याने या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, पंचवटी विभागातील 1 ते 6 प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना -राष्ट्रवादी आघाडी अशाच लढती होणार असून, सर्वच प्रभागांमध्ये दुरंगी निवडणूक होणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे आज मतदार कोणाच्या झोळीत मतदानाचे दान टाकणार, याकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
गेले दहा-पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर मंगळवारी (दि. 13) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर उमेदवारांकडून गुप्त प्रचारावर जोर दिला. पंचवटी विभागातील एक ते सहा प्रभागांमध्ये एकूण 24 जागांसाठी 119 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात प्रभाग क्रमांक पाचमध्ये चार जागांसाठी केवळ 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने अनेक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी केली आहे. यात प्रभाग क्रमांक एकमध्ये अमित घुगे, डॉ. सचिन देवरे यांनी तर सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तेथील मतदान विभागण्याची शक्यता आहे. तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला गटात दुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते. प्रभाग दोनमध्येदेखील निवडणूक सोपी राहिलेली नाही. या ठिकाणी दुरंगी लढत होईल असे दिसते. प्रभाग क्रमांक दोनमध्येदेखील दुरंगीच लढत होईल असे चित्र दिसत असून, धोत्रे खून प्रकरणातील माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे रिंगणात असल्याने या प्रभागातील निवडणुकीकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये भुजबळ समर्थक अंबादास खैरे हे असल्याने या प्रभागात माजी आमदार बाळासाहेब सानप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रभागातदेखील भाजप आणि शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये लढत होणार आहे. या प्रभागात भाजपचे माजी नगरसेवक आणि बंडखोर उमेदवार रुची कुंभारकर यांच्या बंडखोरीचा फटका कोणाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक चारमध्येदेखील भाजप आणि शिवसेना शिंदे गट -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्येच दुरंगीच लढत होईल. या प्रभागातील माजी नगरसेवक जगदीश पाटील हे कारागृहात असल्याने त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, यावरदेखील बरेच गणित अवलंबून आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक आणि कमलेश बोडके यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हातात घेतल्याने भाजपला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांच्यात तसेच माजी नगरसेवक कमलेश बोडके आणि खंडू बोडके यांच्यातदेखील चांगली लढत होणार असल्याने या प्रभागातील निवडणूकदेखील चांगलीच रंगतदार होणार आहे.

प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उबाठा या तीन पॅनलमध्ये लढत होत असली, तरी खरी रंगत दुरंगीच होईल, असे चित्र दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाकडून सर्वच उमेदवार तरुण असल्याने त्यात एक माजी नगरसेविकादेखील असून, यांच्यामधील मतविभागणीचा फटका कोणाला बसतो हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, या प्रभागात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात आघाडी झाल्याने या पॅनलमध्ये आमदार हिरामण खोसकर यांची कन्या इंदुमती भोये (खोसकर) निवडणुकीत उतरल्या असल्याने या प्रभागातील निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.

Who will the voters donate their votes to?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago