निवडणूक आयोगाने दिली 8 ऑगस्टपर्यंत मुदत
नवी दिल्ली: राज्यात सत्तांतर झाल्यानं तर आता शिवसेना कोणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे, आमचीच शिवसेना खरी असा दावा एकनाथ शिंदे यांनी दावा ठोकल्यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत,
शिंदेंनी जवळपास शिवसेना हायजॅक केल्याची चर्चा सुरु झाली. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा सांगितला. त्यामुळे शिवसेना कुणाची या वादाला तोंड फुटलं. अखेर हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे.
निवडणूक आयोगाने या वादावरुन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करायला सांगितले आहेत.
निवडणूक आयोगाने हे कागदपत्र सादर करण्यासाठी दोन्ही गटांना 8 ऑग्स्टपर्यंतची मुदत दिली आहे. या दोन्ही गटांना 8 ऑग्स्टला दुपारी 1 पर्यंत हे पुरावे सादर करायचे आहे. त्यामुळे आता या दोन्ही गटाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून असणार आहे.