आरटीओ, वाहतूक पोलिसांचा कानाडोळा
देवळाली कॅम्प : भैयासाहेब कटारे
शहरात खासगी वाहनांवर राजमुद्रा लावून फिरणार्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, वाहतूक पोलिस, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
विविध सरकारी कार्यालयांच्या परिसरात ही वाहने आढळून येतात. यात माजी तसेच विद्यमान आमदार, खासदारांच्या गाड्यांबरोबरच कार्यकर्त्यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. शहरातील अनेक आमदारांचे डावे-उजवे तसेच एकनिष्ठ कार्यकर्ते स्वत:च्या वाहनावर राजमुद्रेचे स्टिकर लावून पोलिसांसमोरच मुक्तपणे वावरताना दिसून येतात. या कार्यकर्त्यांना कुणीच याबद्दल जाब विचारताना दिसून येत नाही. त्यामुळे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
नियम काय सांगतो?
भारताचे राष्ट्रीय चिन्ह (राजमुद्रा) केवळ अधिकृत शासकीय वापरासाठीच आहे. शासकीय वाहनांवरच ते आदेशानुसार वापरता येते. खासगी वाहनांवर राजमुद्रा वापरणे एालश्रशाी रपव छराशी अलीं, 1950 चा भंग ठरतो. खासगी वापरासाठी (उदा. खासदार/आमदारांची वैयक्तिक गाडी किंवा व्यावसायिक वापर) राजमुद्रा वापरणे बेकायदेशीर आहे. त्यावर कारवाई होऊ शकते. खासदार, आमदार केवळ चशालशी ेष झरीश्रळराशपीं किंवा चङअ असे फलक लावू शकतात. मात्र, राजमुद्रा वापरणे निषिद्ध आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…