गर्लफ्रेंडसाठी पत्नीला दिले विषारी इंजेक्शन

धुळे :
धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केली. प्रेमसंबंधाला अडसर ठरलेल्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन खून करणार्‍या सैन्य दलातील लिपिकासह प्रेयसी, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांना पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे.


आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कपिल बाळू बागुल या जवानाचं प्रज्ञा कर्डिले या महिलेसोबत कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. आता गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञासोबत जवळीक वाढली होती. जवान कपिल बागुल याची पत्नी शारदा यांच्यात यावरून वाद झाला. त्यानंतर शारदाला संपवण्यासाठी त्याने बळजबरीनं पेस्टीसाईडचं इंजेक्शन दिलं. त्यावेळी शारदा तडफडू लागली आणि तिच्या तोंडातून फेस आला मात्र तो तिथे बसून फक्त तमाशा पाहत राहिला. तिचा छळ करण्यात येत होता. शारीरिक छळ करून मारले, फोन आला तर ती आजारी आहे त्यानंतर अर्ध्या तासात तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. असा कोणता आजार झाला होता, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. आपल्या पत्नीला मारणार्‍या जवानाने त्याने नंतर तिला रूग्णालयात नेण्याचं नाटक केलं आणि घाई करत तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबियांनी तक्रार केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. मयत महिलेचा भाऊ भूषण महाजन याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पती कपिल बाळू बागुल, सासरे बाळू बुधा बागुल, सासू विजया बाळू बागुल (तिघेही रा. वलवाडी), नणंद रंजना धनेश माळी (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि प्रेयसी प्रज्ञा कर्डीले (रा. धुळे) या पाचही जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्री या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *