नाशिक

मालेगावात चारित्र्यावर संशय घेत नवर्‍याकडून बायकोचा खून

पाण्याच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये  बुडवून बायकोचा खून

मालेगाव :  शहरात नवर्‍याने बायकोचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना घडली आहे.  मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील द्याने शिवारातील फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ ही घटना घडली आहे. येथे राहणारे अब्दुल वफा अब्दुल रेहमान याने बायकोवर संशय घेत तिला खून  केल्याची घटना  घडली  आहे.  रमजान पुरा भागात खान कुटूंबिय राहते. या  नवरा बायकोत सातत्याने भांडणे होत असत. संशयित अब्दुल वफा हा नेहमी पत्नीला मारहाण करीत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोघांत नेहमी भांडणे होत असत. दि. २१ जुलै रोजी देखील रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित अब्दुल वफा याने पत्नीवर संशय घेत  मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने  पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये बुडवून खून केला. या प्रकरणी रमजान पुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.  अदनान खान यांनी रमजान पुरा पोलिसात दिलेल्या  तक्रारीनुसार अब्दुल खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago