नाशिक

अवघ्या पन्नास रुपयांसाठी पत्नीचा खून

वाडीवर्‍हेची घटना; मद्यपी पतीला अटक

इगतपुरी : प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी  50 रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने मद्यपी पतीने लोखंडी रॉड पत्नीच्या डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्‍हे परिसरातील सांबरवाडी (गणेशवाडी ) येथे घडली. याबाबत वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात मयताचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे.या घटनेबाबत वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मद्यपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.  घटनेचे गांभीर्य पाहुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत तपास कामी सूचना केल्या.
वाडीवर्‍हे परिसरामध्ये असलेली सांबरवाडी ( गणेशवाडी) येथील लालू सोपान मोरे पत्नी, मुलगा व सून यांच्या सोबत राहतो. त्यांचा मुलगा राकेश सोपान मोरे, वय 23 वर्ष हा मासे विक्रीचा व्यवसाय करतो. लालू सोपान मोरे हा दारू पिऊन रात्री घरी आला होता.  मीराबाई (45) हिच्याकडे तो 50 रुपये दारू पिण्यासाठी मागत होता. मात्र तिने नकार देताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.काही वेळानंतर तो घरातून निघून गेला. सर्व जणांनी जेवण केले. मुलगा राकेश व सून बाहेर पडवीत झोपण्यासाठी गेले असता मिराबाई घरात एकटीच झोपली होती.त्यानंतर रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान  लालू सोपान मोरे घरी आल्यानंतर दरवाजा लावून घेतला. पैसे न दिल्याचा राग मनात धरून  मिराबाईला मारहाण करू लागला.  लोखंडी रॉडने लालू मोरे याने तिच्या डोक्यावर, तोंडावर जोरदार प्रहार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. गोंगाट ऐकून मुलगा व सून दरवाजा वाजवू लागले.काही वेळाने लालू याने स्वतःच दरवाजा उघडून मुलाला म्हणाला की मी तुझ्या आईला मारून टाकले आहे. तुला काय करायचे ते कर. राकेश याने वेळ न दवडता 108 नंबरला कॉल करून रुग्णवाहीका बोलावून घेतली. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मीराबाई हिला मृत घोषित केले. याबाबत त्यांनी तात्काळ वाडीवर्‍हे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीस ताब्यात घेतले. अधिक तपास वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवर्‍हे पोलीस करत आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

2 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

3 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

3 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

3 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

3 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

4 days ago